देस्तेरो, वास्को येथे मोठे झाड घरांवर कोसळले; अनेक घरांचे नुकसान

१० लाखांचे नुकसान झाल्याचा स्थानिकांचा दावा; देस्तेरो, वास्को येथील ‘बिझी बी’ स्कूलच्या मागील बाजूस असलेले एक मोठे झाड मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. पहाटे घडलेल्या या घटनेत अनेक घरांसह एका गोदामाचे मोठे नुकसान झाले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
4 hours ago
देस्तेरो, वास्को येथे मोठे झाड घरांवर कोसळले; अनेक घरांचे नुकसान

वास्को: देस्तेरो, वास्को येथील ‘बिझी बी’ स्कूलच्या मागील बाजूस असलेले एक मोठे झाड मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. पहाटे घडलेल्या या घटनेत अनेक घरांसह एका गोदामाचे मोठे नुकसान झाले.

झाड घरांवर कोसळताच एका घरातील ज्येष्ठ नागरिकाला तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.


अग्निशमन अधिकारी दिलीप डिचोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, झाडाचा मोठा आकार आणि पडलेला मलबा पाहता तो हटवण्यासाठी जीएसएल (GSL)  कडून क्रेन मागवण्यात आली आहे. घटनेची माहिती मामलेदार आणि तलाठ्यांना देण्यात आली आहे. मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.


दरम्यान, रहिवासी आबिद तसेच इतरांनी या घटनेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले. झाड घरावर कोसळल्याने सुमारे १० लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. सुदैवाने पहाटेच्या वेळी मोठी दुर्घटना टळली असली तरी, झाड कोसळल्याने घरांचे झालेले नुकसान आणि मलबा हटवण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

हेही वाचा
सर्व पहा