जीत आरोलकर मगो मध्येच राहणार : मगो नेते सुदिन ढवळीकर

भाजप प्रवेशाच्या चर्चेवर मंत्री ढवळीकर यांची प्रतिक्रिया; मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे मगो पक्षात असून ते मगो मध्येच राहतील, असा ठाम विश्वास वीजमंत्री तथा मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
जीत आरोलकर मगो मध्येच राहणार : मगो नेते सुदिन ढवळीकर

पणजी : मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे मगो पक्षात असून ते मगो मध्येच राहतील, असा ठाम विश्वास वीजमंत्री तथा मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला आहे.

जीत आरोलकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मंत्री ढवळीकर यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून जीत आरोलकर भाजपमध्ये जाणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर ढवळीकर यांना विचारले असता, “जीत आरोलकर हे मगो पक्षात आहेत आणि मगोमध्येच राहतील,” असे  स्पष्ट केले. आरोलकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे गोव्यातील राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली होती. मात्र, ढवळीकर यांच्या या वक्तव्यामुळे जीत आरोलकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा
सर्व पहा