मडगावकरांवर माझा पूर्ण विश्वास, निवडणुकीची चिंता नाही: दिगंबर कामत

मडगावकरांवरील विश्वासामुळे निवडणुकीचा विचार करत नसल्याचे मंत्री दिगंबर कामत म्हणाले. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली; पर्वरी उड्डाणपुलाबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
मडगावकरांवर माझा पूर्ण विश्वास, निवडणुकीची चिंता नाही: दिगंबर कामत

पणजी: मडगावकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. या विश्वासामुळेच मी निवडणुकीचा केव्हाच फार विचार केला नाही. ही माझी नववी निवडणूक आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे मला निवडणुकीत फार विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत, असा ठाम विश्वास सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी व्यक्त केला.

गोवा राज्यात निवडणुका जवळ आल्याने विविध राजकीय पक्षांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. मंत्री, आमदार आणि इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना कामत यांनी आपले मत मांडले.

पर्वरी फ्लायओव्हरमुळे अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला गती

दरम्यान, पर्वरी येथील बहुप्रतिक्षित सहापदरी फ्लायओव्हरचे उद्घाटन आज सायंकाळी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. या प्रकल्पाबाबत बोलताना दिगंबर कामत म्हणाले की, "जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता राज्य सरकारने केली आहे. हा उड्डाणपूल केवळ वाहतुकीच्या सोयीसाठीच नव्हे, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला गती देण्यासाठी अत्यंत पूरक ठरेल. या प्रकल्पामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्यास नक्कीच मदत होईल."

उड्डाणपुलावर वाहनांच्या वेगावर मर्यादा

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एनएच-६६ महामार्गावरील या नव्या सहापदरी फ्लायओव्हरवर वाहनांच्या वेगाची कमाल मर्यादा ताशी ६५ किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून अतिवेगाने वाहने चालवणे बेकायदेशीर ठरेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

हेही वाचा
सर्व पहा