भाजपमध्ये ऐनवेळी ‘शॉकर्स’ मिळतील!

आगामी निवडणुकीत भाजपचे मुख्य लक्ष्य २७ ते ३० जागा जिंकण्याचे असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटना अधिक मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाणे, यावर भाजपचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Story: गाेवन वार्ता प्रतिनिधी |
11th November, 11:58 pm
भाजपमध्ये ऐनवेळी ‘शॉकर्स’ मिळतील!

मडगाव : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये कोणाचा प्रवेश होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सूचक विधान केले आहे. राजकारणात अनेक निर्णय ऐनवेळी घेतले जातात. त्यामुळे आगामी काळात काही राजकीय ‘शॉकर्स’ पाहायला मिळू शकतात, असे संकेत त्यांनी दिले.
बोर्डा फातोर्डा येथे एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाईक यांनी भाजपच्या संभाव्य पक्षप्रवेशांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपमध्ये कोण प्रवेश करणार, याबाबत विचारले असता, राजकारणात अनेक घडामोडी शेवटच्या क्षणी घडतात. त्यामुळे होणाऱ्या राजकीय हालचाली किंवा धक्क्यांची माहिती आधीच जाहीर केली जात नाही, असे त्यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीत भाजपचे मुख्य लक्ष्य २७ ते ३० जागा जिंकण्याचे असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटना अधिक मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाणे, यावर भाजपचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आगामी काळात कोण पक्षात प्रवेश करतो आणि कोण कोणती राजकीय पावले उचलतो, हे सर्वांना हळूहळू समजेल, असे सांगत त्यांनी संभाव्य पक्षप्रवेशांबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला.
दरम्यान, चर्चेत असलेल्या काही विशिष्ट नेत्यांच्या नावांबाबत विचारणा केली असता, नाईक यांनी हसत ‘नो कॉमेंट्स’ असे उत्तर देत अधिक भाष्य करणे टाळले. त्यामुळे भाजपमध्ये आगामी काळात कोणते राजकीय प्रवेश होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.