म्हापसा : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अर्जुन रामपाल (Actor Arjun Rampal) याने गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (South African model and fashion entrepreneur Gabriella Demetriades) या दक्षिण आफ्रिकेतील प्रेयसीसोबत कायदेशीररीत्या विवाह केला. शुक्रवारी म्हापसा (Mapusa Goa) येथील बार्देश उपनिबंधक कार्यालयात या विवाहाची नोंदणी प्रक्रिया पार पडली.
रामपाल यांचा सुकूर-पर्वरी (Socorro-Porvorim) येथे बंगला आहे. सध्या ते सुकूर येथील रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या विवाहाची कायदेशीर नोंदणी गोव्यात केली आहे. बार्देशचे उपनिबंधक सुराज वेर्णेकर यांच्यासमोर रामपाल व गॅब्रिएला यांनी आपल्या विवाहाची ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. यावेळी नातेवाईक आणि जवळचा मित्रपरिवार उपनिबंधक कार्यालयात उपस्थित होते.


