Home >> सिनेवार्ता >> आदिनाथ-उर्मिलाच्या घटस्फोटाची घोषणा; १६ वर्षांचा प्रवास संपला

आदिनाथ-उर्मिलाच्या घटस्फोटाची घोषणा; १६ वर्षांचा प्रवास संपला

सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती .

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
33 mins ago
आदिनाथ-उर्मिलाच्या घटस्फोटाची घोषणा; १६ वर्षांचा प्रवास संपला

मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय, लाडकं आणि आदर्श मानलं जाणारं जोडपं म्हणजेच अभिनेता-दिग्दर्शक आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे आता अधिकृतपणे वेगळे झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात दुरावा आल्याच्या आणि ते वेगळे राहत असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, आता स्वतः आदिनाथ आणि उर्मिला यांनी सोशल मीडियावर एक संयुक्त आणि अत्यंत भावूक पत्रक प्रसिद्ध करत त्यांच्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे. 

उर्मिला आणि आदिनाथ यांनी अधिकृत पोस्ट शेअर करत त्यांचा निर्णय सगळ्यांना सांगितला. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय,


आदिनाथ आणि उर्मिला यांची लव्ह स्टोरी मराठी इंडस्ट्रीतील सर्वांत रोमँटिक आणि चर्चिलेल्या प्रेमकथांपैकी एक होती. त्यांची पहिली भेट २००६ मध्ये झाली होती. आदिनाथ आपले वडील महेश कोठारे यांच्यासोबत ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता, तर उर्मिला या चित्रपटाची मुख्य नायिका होती. एका मुलाखतीत आदिनाथने सांगितले होते की, जेव्हा तो सकाळी झोपेतून उठून बाहेर आला, तेव्हा उर्मिला त्यांच्या घरी चित्रपटाच्या कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी बसली होती. तिला पाहताच क्षणी आदिनाथ तिच्या प्रेमात पडला होता. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावरील एका कॅफेमध्ये आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केले होते. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, २०११ मध्ये ते अत्यंत थाटामाटात विवाहबंधनात अडकले होते.

All's not well between 83 actor Addinath M Kothare and his actress wife  Urmilla Kothare?

पण, गेल्या काही वर्षांपासून या हसत्या-खेळत्या नात्यात काहीतरी बिनसल्याची कुजबूज सुरू झाली होती. दोघे एकत्र दिसत नसल्याने आणि एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवरून गायब झाल्याने नेटिझन्सनी त्यांच्या घटस्फोटाचे अंदाज बांधायला सुरुवात केली होती. अखेर या सर्व चर्चांना दोघांनी मिळून पूर्णविराम दिला आहे.


Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: 'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट


सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्यांच्या अधिकृत निवेदनात या दोघांनी परिपक्व भूमिका मांडली आहे. त्यांनी लिहिले आहे की, खूप विचार केल्यानंतर त्यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून त्यांचा हा प्रवास इथेच संपत असला, तरी त्यांची मुलगी जिजा हिच्यासाठी ते नेहमी एकत्र राहतील. तसेच, या विषयावर हे त्यांचे एकमेव आणि अंतिम वक्तव्य असेल, यापुढे ते यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.