१४ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला अटक

संशयिताने मुलीचा केला होता पाठलाग

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th November 2024, 12:37 am
१४ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला अटक

पणजी : जुने गोवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका १४ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी ३५ वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याला अटक केली आहे. 

जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी गुरुवारी ७ रोजी तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित ३५ वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याने ६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पिडीत मुलगी घरी जात असताना तिच्या पाठलाग केला. त्यानंतर वाटेतच तिच्या विनयभंग करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. 

याची दखल घेऊन जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर याच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनीश नाईक यांनी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७८ आणि गोवा बाल कायद्याचे कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करू तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवार ८ रोजी उत्तररात्री १२.४० वाजता संशयिताला अटक केली आहे.             

हेही वाचा