धर्मापुरात कदंबची दुचाकीला धडक; दुचाकी चालक महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd April, 12:08 pm
धर्मापुरात कदंबची दुचाकीला धडक; दुचाकी चालक महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

मडगाव : धर्मापूर-नावेली येथे कदंब बसची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकी चालक महिला गंभीर जखमी झाली होती. तिचा उपचारादरम्यान दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याकडेला झुडूपात जाऊन कलंडली. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मडगावहून कुंकळ्ळीकडे जाणार्‍या महामार्गावर आज सकाळी धर्मापूर दरम्यान कदंब बस आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या बसचा डिओ दुचाकीला धक्का बसल्याने दुचाकी चालक महिला रस्त्यावर पडली. यात ती गंभीर जखमी झाली होती. यानंतर प्रवाशांनी भरलेल्या या बसच्या चालकाचा वाहनावरील ताबाही सुटला अन् बस रस्त्याकडला झुडपात कलंडली. या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी लगेच रुग्णवाहिकेला पाचारण केले आणि गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालक महिलेला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मडगाव पोलिसांकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून तपास केला जात आहे.

(बातमी अपडेट होत आहे.)

हेही वाचा

रस्त्याचा अंदाज न आल्याने सिर्ली धर्मापूर येथे झालेल्या चारचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू

मडगाव येथील अपघातात दोन महिला जखमी

रेंन्ट ए बाईक, रेंन्ट ए कॅबकडून तीन वर्षांत २०० अपघात

दोन वर्षांत १८८ स्वयंअपघातांत १९२ जणांचा मृत्यू

हेही वाचा