जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; आज ५० मतदारसंघांत मतदान

८ लाख ६९ हजार मतदार बजावणार हक्क : सोमवारी मतमोजणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th December, 10:39 pm
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; आज ५० मतदारसंघांत मतदान

पणजी : उत्तर व दक्षिण गोव्यातील जिल्हा पंचायतीच्या ५० मतदारसंघांसाठी शनिवारी (दि. २०) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतपत्रिकेच्या आधारे मतदान होईल. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

२२६ उमेदवार आणि ८.६९ लाख मतदार
दोन्ही जिल्हा पंचायतीत मिळून २२६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये उत्तर गोव्यात १११ तर दक्षिण गोव्यात ११५ उमेदवारांचा समावेश आहे. राज्यातील एकूण ८ लाख ६९ हजार ३५६ मतदार आपला हक्क बजावतील. गुरुवारी सायंकाळी जाहीर प्रचार समाप्त झाला असून शुक्रवारी उमेदवारांनी मतदारांच्या व्यक्तिगत गाठीभेटी घेण्यावर भर दिला.

अटीतटीची लढत आणि सोमवार निकाल
यावेळी बहुतांशी उमेदवार नवीन असल्याने निकालाचे अंदाज वर्तविणे कठीण झाले आहे. तरीसुद्धा ९ विद्यमान सदस्य आणि २०२० मधील १२ उमेदवार पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत. शनिवारी २० डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर सोमवार २२ रोजी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होईल.

पक्षीय बलाबल
भाजपने ४० तर मगोने ३ मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. इतर ७ ठिकाणी त्यांनी अपक्षांना पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजी आणि ‘आप’चे उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे.

निवडणुकीची सांख्यिकी (एकूण)

तपशील उत्तर गोवा दक्षिण गोवा एकूण
मतदारसंघ २५ २५ ५०
उमेदवार १११ ११५ २२६
मतदान केंद्रे ६५८ ६२६ १,२८४
पुरुष मतदार २,१३,७०४ २,०६,९०२ ४,२०,६०६
महिला मतदार २,२६,४९२ २,२२,२५३ ४,४८,७४५
एकूण मतदार ४,४०,१९९ ४,२९,१५७ ८,६९,३५६

उत्तर गोवा : मतदारसंघनिहाय मतदार संख्या

मतदारसंघ मतदार मतदारसंघ मतदार
१) सुकूर२४,३१२१४) नगरगाव१६,४५९
२) खोर्ली२३,४६७१५) कारापूर-सर्वण१६,२६४
३) कळंगुट२२,११७१६) होंडा१६,२३९
४) ताळगाव१९,७५४१७) धारगळ१६,२०३
५) चिंबल१९,५६०१८) हरमल१६,०६२
६) रेईश मागूश१८,९३४१९) मये१५,८५३
७) सांताक्रुज१८,८२४२०) कोलवाळ१५,७९५
८) हळदोणा१७,८९०२१) शिवोली१५,६७२
९) सेंट लॉरेन्स१७,४०१२२) मोरजी१५,५५७
१०) पेन्ह द फ्रान्स१७,३३८२३) लाटंबार्से१५,३५२
११) शिरसई१७,३१४२४) तोरसे१५,०६१
१२) केरी१७,०७६२५) पाळी१४,६२१
१३) हणजूण१७,०७४--

दक्षिण गोवा : मतदारसंघनिहाय मतदार संख्या

मतदारसंघ मतदार मतदारसंघ मतदार
१) सांकवाळ२८,४०५१४) रिवण१६,६६६
२) बाणावली२०,११९१५) गिर्दोली१६,३६०
३) कवळे१९,९९३१६) शिरोडा१६,०२०
४) दवर्ली१९,९१८१७) नावेली१५,६७८
५) कुडतरी१९,८००१८) धारबांदोडा१५,६१२
६) कुर्टी१९,०४४१९) नुवे१५,२७३
७) बेतकी खांडोळा१८,४६१२०) सावर्डे१४,६७५
८) वेलिंग प्रियोळ१८,०५७२१) खोला१४,१४६
९) वेळ्ळी१७,५४८२२) शेल्डे१४,११०
१०) कोलवा१७,५३१२३) बोरी१४,००४
११) कुठ्ठाळी१७,४४३२४) बार्शे१३,९४४
१२) राय१६,९२५२५) उसगाव गांजे१२,६०५
१३) पैंगीण१६,८२०