झेडपी : विक्रमी ७०.८१ टक्के मतदान; महिला सर्वाधिक

लाटंबार्सेत सर्वाधिक; नावेलीत नीचांकी : उद्या निकाल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th December, 11:28 pm
झेडपी : विक्रमी ७०.८१ टक्के मतदान; महिला सर्वाधिक

पणजी : राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात एकूण ७०.८१ टक्के मतदानाची नोंद झाली. उत्तर गोव्यातील लाटंबार्से मतदारसंघात सर्वाधिक ८८.२९ टक्के, तर सासष्टीतील नावेली मतदारसंघात सर्वात कमी ५५.२९ टक्के मतदान झाले.

विक्रमी मतदान आणि शांतता
सकाळच्या सत्रात मतदानाची गती मंद होती; मात्र दुपारनंतर मतदारांची मोठी गर्दी दिसून आली. सर्व ठिकाणी मतदानाची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. यावेळच्या झेडपी निवडणुकीत मागील दोन निवडणुकांचे विक्रम मोडले गेले. २०१५ मध्ये ६६.४३ टक्के आणि २०२० मध्ये ५६.८३ टक्के मतदान झाले होते; त्यापेक्षा यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे.

महिलांची आघाडी
राज्यातील ५० झेडपी मतदारसंघांत १,२८४ मतदान केंद्रांवर मतदान झाले. एकूण ८,६८,६३७ मतदारांपैकी ६,१५,५८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक होती. २,९५,७२० पुरुष, ३,१९,८५९ महिला आणि २ तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले. विभागवार विचार करता, उत्तर गोव्यातील २५ मतदारसंघांत ७२.६६ टक्के, तर दक्षिण गोव्यातील २५ मतदारसंघांत ६८.९३ टक्के मतदान झाले.

वेळेनुसार मतदानाची टक्केवारी

वेळ टक्केवारी
सकाळी ८ ते १०१५.११ %
दुपारी १२ पर्यंत३२.५८ %
दुपारी २ पर्यंत४८.७६ %
सायंकाळी ४ पर्यंत६३.५९ %
अंतिम (सायं. ५ वाजता)७०.८१ %

उत्तर गोवा : मतदारसंघनिहाय मतदान

मतदारसंघ मतदान (%) मतदारसंघ मतदान (%)
लाटंबार्से८८.२९केरी८७.९९
नगरगाव८६.७१पाळी८६.५८
होंडा८५.५३हरमल८०.४३
मये७९.६९कारापूर-सर्वण७९.४०
धारगळ७६.४०कोलवाळ७६.०९
तोरसे७६.०२हणजूण७२.६७
मोरजी७२.५९शिवोली६९.१२
खोर्ली६८.४६कळंगुट६६.८७
चिंबल६६.७८हळदोणे६६.४९
सांताक्रूझ६४.९८सुकूर६४.९३
रेईश मागूश६४.७४पेन्ह द फ्रान्स६४.३२
सेंट लॉरेन्स६३.९८शिरसई६५.८८
ताळगाव५९.४४--

दक्षिण गोवा : मतदारसंघनिहाय मतदान

मतदारसंघ मतदान (%) मतदारसंघ मतदान (%)
उसगाव-गांजे८२.८४बेतकी-खांडोळा८१.३२
बार्से८०.१९सावर्डे७९.२१
रिवण७८.९८धारबांदोडा७८.७९
पैंगीण७६.३६कुर्टी७४.६७
खोला७३.७७शिरोडा७३.४९
वेलिंग-प्रियोळ७३.२३बोरी७२.८३
शेल्डे७२.५७गिरदोली७०.७५
कवळे६८.६३दवर्ली६५.७८
सांकवाळ६३.९९नुवे६२.७२
कुडतरी६०.२६कोलवा५९.९७
बाणावली५९.७०राय५९.२३
कुठ्ठाळी५६.९६वेळ्ळी५६.५२
नावेली५५.२९--

सोमवारी निकाल
उत्तर गोव्यात १११, तर दक्षिण गोव्यात ११५ असे एकूण २२६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या सर्वांचे भवितव्य आता मतपेट्यांत बंद झाले आहे. कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, हे सोमवार, २२ डिसेंबर रोजी स्पष्ट होईल. ५० मतदारसंघांची मतमोजणी सकाळी ८ वाजता १५ मतमोजणी केंद्रांवर होणार आहे.

#Goa #ZillaPanchayatElection #RecordVoting #GoaNews #ElectionUpdate #ZPElection2025 #NorthGoa #SouthGoa
हेही वाचा