गोवा फॉरवर्ड ०१, आरजीपी ०१, मगो ०१ अपक्ष ०३

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीची (Zilla Panchyat Election Result)) मतमोजणी सुरू आहे. दुपारपर्यंत पुढे आलेल्या निकालात सत्ताधारी भाजप पक्षाने १३ जागांवर विजय मिळवत वर्चस्व राखले आहे. कॉंग्रेस पक्षाला ५, गोवा फॉरवर्ड १, आरजीपी १, मगो १ जागा मिळाली आहे. ३ अपक्ष विजयी झाले आहेत.
भाजपने केरी, नगरगाव, गांजे-उसगाव, होंडा, सर्वण-कारापूर, लाटंबार्से, ताळगाव, सुकूर, सावर्डे, सांकवाळ, कळंगुट, शिवोली, रिवण या मतदारसंघांत विजय मिळवला आहे. कॉंग्रेसने खोला, गिरदोली, दवर्ली, कुडतरी या मतदारसंघांत विजय मिळवला आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीने राय, आरजीपीने सांताक्रुझ, मगोने कवळेत तर अपक्ष उमेदवाराने हरमल, कोलवाळ, बेतकी खांडोळा येथे विजय मिळवला आहे.
दुपारी २ वाजेपर्यंतचे आकडे
भाजपः १३
काँग्रेसः ०५
गोवा फॉरवर्डः ०१
आरजीपीः ०१
मगोः ०१
अपक्षः ०३