पेडणेतील ४ झेडपी मतदारसंघातील २२ उमेदवारांचा आज लागणार निकाल

मतदान टक्केवारीत लक्षणीय वाढ : दिग्गजांना धक्का बसण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st December, 11:59 pm
पेडणेतील ४ झेडपी मतदारसंघातील २२ उमेदवारांचा आज लागणार निकाल

पेडणे : पेडणे तालुक्यातील मोरजी, हरमल, तोरसे, धारगळ या चारही जिल्हा पंचायत मतदारसंघांतील एकूण २२ जिल्हा पंचायत उमेदवारांचा निकाल सोमवारी दुपारपर्यंत लागण्याची शक्यता आहे. मतदानाची टक्केवारी बरीच वाढल्यामुळे या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना धक्का बसू शकताे.
या निवडणुकीत हरमल मतदारसंघातून एकूण १६,६६२ मतदारांपैकी १२,८३० मतदारांनी मतदान केले त्यात ६,४३५ महिला, तर ६,३९५ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून एकूण ७९.८५ टक्के मतदान झाले.
धारगळ मतदारसंघातील एकूण १६,२३० मतदारांपैकी १२,३७९ मतदारांनी सहभाग दर्शवला त्यामध्ये ६,२६० पुरुषांनी तर ६,११९ महिलांनी मतदानाचा हक्क बजावून ७६.४० टक्के मतदान झाले.
तोरसे मतदारसंघात एकूण १५,०६१ मतदारांपैकी ५,५८७ महिला व ५,८६१ पुरुष मिळून ११,४४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मोरजी मतदारसंघात एकूण १५,५५७ मतदारांपैकी ११,३०३ मतदारांनी हक्क बजावला त्यात ५,६६८ पुरुष, तर ५,६३५ महिला मतदारांनी हक्क बजावून ७२.६६ टक्के मतदान झाले.

राजकीय प्रतिष्ठा पणाला
ही निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट मानली जात आहे. भाजप आणि मगो युतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी आमदार जीत आरोलकर, आमदार प्रवीण आर्लेकर आणि माजी आमदार दयानंद सोपटे यांनी मोठी ताकद लावली आहे. दुसरीकडे, विरोधकांनी जरी संघटित उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला असला, तरी अनेक ठिकाणी बहुकोनी लढतींमुळे मतविभाजनाची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा