मडगावात मध्यरात्री कारचा थरार! खारेबांध उड्डाणपुलाजवळ उभ्या वाहनांना दिली जोरदार धडक

सीसीटीव्ही फुटेज आले समोर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
43 mins ago
मडगावात मध्यरात्री कारचा थरार! खारेबांध उड्डाणपुलाजवळ उभ्या वाहनांना दिली जोरदार धडक

पणजी : मडगाव येथील खारेबांध रेल्वे उड्डाणपुलाजवळ काल मध्यरात्री उशिरा एका भरधाव कारने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांना भीषण धडक दिली. रवीराज कॅफेच्या अगदी जवळ घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास एक कार खारेबांध उड्डाणपुलावरून अत्यंत वेगाने येत होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने या भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पार्क केलेल्या वाहनांना एकामागून एक धडक दिली. यात अनेक गाड्यांचे नुकसान झाले. सुदैवाने, ही घटना मध्यरात्री घडल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता.




या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून, त्यात कारचा वेग आणि धडकेची तीव्रता स्पष्टपणे दिसत आहे. अपघातानंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला  हा अपघात मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्यामुळे झाला की अन्य काही तांत्रिक बिघाडामुळे, याचा तपास मडगाव पोलीस करत आहेत.



हेही वाचा