लग्नाचे आमिष दाखवून जीम व्यावसायिकाकडून लैंगिक अत्याचार

जीम ट्रेनरने मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. ती गरोदर राहिल्यामुळे तिने संशयिताकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला. मात्र संशयिताने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
लग्नाचे आमिष दाखवून जीम व्यावसायिकाकडून लैंगिक अत्याचार

पणजी : तिसवाडी तालुक्यातील ४१ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी पणजी महिला पोलिसांनी एका २८ वर्षीय जीम व्यावसायिकच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने पणजी महिला पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार, संबंधित जीम ट्रेनरने तिच्याशी मैत्री केली. तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, या कालावधीत ती गरोदर राहिल्यामुळे तिने सदर संशयिताकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला. त्यानंतर संशयिताने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर पीडित महिलेने संशयिताविरोधात तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन महिला पोलीस स्थानकाचे निरीक्षक मीरा डिसिल्वा याच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रूपाली गोवेकर यांनी संशयित जीम ट्रेनरविरोधात भान्यासंच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, संशयिताने मेरशी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर २२ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.