तरवळे-शिरोडा येथे बिबट्या अडकला घराच्या गेटमध्ये

वन खात्याने जेरबंद करून केले उपचार

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
10 hours ago
तरवळे-शिरोडा येथे बिबट्या अडकला घराच्या गेटमध्ये

फोंडा : तरवळे-शिरोडा येथील महेश शिरोडकर यांच्या घरा समोर शुक्रवारी सकाळी बिबट्याने हजेरी लावल्यानंतर स्थानिक लोकांची तारांबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फोंडा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याला जेरबंद केले. जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याचे वय ३-४ वर्षे असण्याची शक्यता वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी सकाळी महेश शिरोडकर यांच्या घरासमोर अचानक बिबट्या प्रकटला. बिबट्या लोकवस्तीत दाखल झाल्याने स्थानिक लोकांनी महेश शिरोडकर यांच्या घराजवळ धाव घेतली. त्यावेळी गोंधळलेल्या बिबट्याने परिसरातील घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र तो व्हरांड्यातील गेटमध्ये अडकून पडला. स्थानिक लोकांनी त्वरित वन खात्याच्या अधिकाऱ्या माहिती दिली. उत्तर गोव्याचे उपवनपाल जिस वर्की यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यानी बिबट्याला जेरबंद करून उपचारासाठी नेण्यात आले.

हेही वाचा
सर्व पहा