सौर उर्जा पॅनेल बसविण्याच्या नावाखाली ३.६० लाखांची फसवणूक

पेडणेतील साई सन सोलार सिस्टिमच्या मालकाविरोधात गुन्हा; सौर उर्जा पॅनेल बसवून देण्याचे आश्वासन देत ६५ वर्षीय महिलेची ३ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रशांत नाईक (रा. पेडणे, गोवा), साई सन सोलार सिस्टिमच्या मालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
सौर उर्जा पॅनेल बसविण्याच्या नावाखाली ३.६० लाखांची फसवणूक

पणजी : सौर उर्जा पॅनेल बसवून देण्याचे आश्वासन देत ६५ वर्षीय महिलेची ३ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रशांत नाईक (रा. पेडणे, गोवा), साई सन सोलार सिस्टिमच्या मालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओल्ड गोवा येथील मोल्लार परिसरात राहणाऱ्या अमलिना वाझ यांनी याबाबत पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली. २३ मार्च ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत सौर उर्जा पॅनेल बसवून देण्याचे आश्वासन देत संशयिताने त्यांच्याकडून ३ लाख ६० हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मात्र, पैसे घेतल्यानंतरही संबंधित सौर उर्जा पॅनेल बसविण्यात आले नाहीत. तसेच घेतलेली रक्कमही परत करण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे आपली ३ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साईश भोसले करीत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा