म्हापसा : आसगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेले म्हापसाचे माजी नगरसेवक तारक आरोलकर यांच्या कार्यालयाची ईडीच्या पथकाने तपासणी केली. प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून कार्यालयातील कागदपत्रे आणि इतर संबंधीत बाबींची पाहणी करण्यात आल्याची माहिती आहे.
जमीन व्यवहारातील कथित फसवणूकप्रकरणी आरोलकर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि जमीन संबंधित कागदपत्रांचा तपास ईडीकडून सुरू आहे. कार्यालयाच्या तपासणीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील तपासाला दिशा मिळण्याची शक्यता तपास अधिकारी व्यक्त करीत आहेत.


