कांदा आणणार डाेळ्यांत पाणी; ६० रुपये किलो

पणजी बाजारात भाज्यांचे दर चढेच : गणेश चतुर्थीत दर आणखी वाढण्याची शक्यता

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
22 mins ago
कांदा आणणार डाेळ्यांत पाणी; ६० रुपये किलो

पणजी : सोमवारी पणजी बाजारात भाज्यांचे दर चढेच होते. आवक कमी असल्याने नारळाचे दर वाढले आहेत. बाजारात लहान नारळ ४० रुपये, मध्यम आकाराचा नारळ ५० रुपये तर मोठा नारळ ६० रुपये नग होता. बाजारात कांद्याचे दर १० रुपयांनी वाढून ६० रुपये किलो झाले. आल्याचे दर वाढून २५० रुपये किलो झाले. गणेश चतुर्थीच्या काळात नारळासह अन्य भाज्यांचे दर आणखीन वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गत आठवड्याच्या तुलनेत सोमवारी पणजी बाजारात अन्य बाजारचे दर स्थिर होते. वालपापडीचे दर दर्जानुसार ८० ते १२० रूपये किलो होते. फ्लॉवर ५० रु. तर कोबी ४० रु.ला होता. मिरची आणि ढब्बू मिरची दर्जानुसार ८० ते १०० रु. किलो दराने विकली जात होती. बटाटा ४० रु. तर टॉमॅटो दर्जानुसार ४० ते ५० रु. किलो होता. बाजारात गवार ८० रु. किलो होती. लहान वांगी ६० तर मोठी वांगी ८० रु. किलो होती. गाजर, कारले आणि बीट प्रत्येकी ८० रु. किलो होते. तर दुधी भोपळा ५० रु.ला नग होता.
बाजारात मटार १५० ते १८० रु. किलो होते. दोडका १०० रु. तर भेंडी ८० रु. किलो होती. लसूण आकारानुसार २५० ते ४५० रु. किलो होता. मेथी ३० रु. तर शेपू ३० रु. जुडी होती. पालक, तांबडी भाजीची एक जुडी प्रत्येकी २० रु. होती. कोथिंबिरीचे ३० रु. जुडी होती. बाजारात चिबुड आकारानुसार २०० ते ३०० रु. होते. निरफणस १५० ते ३०० रु.ला विकले जात होते. मोठी भेंडी १०० रुपयांना ६ ते ७ नग होती. तर गावठी काकडी १०० रु. ला ४ नग होते. सोमवारी फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर भेंडी ३२ रु., कोबी २५ रु.,फ्लॉवर ३३ रु. एक नग, गाजर ४५ रु.,वालपापडी ४७ रु., मिरची ४५ रु., कांदा ४८ रु., बटाटा २८ रु. तर टोमॅटो २३ रु. किलो होता.             

हेही वाचा
सर्व पहा