ओंकार हत्तीचा तांबोसे बागायतीत धुडगूस; शेतकरी त्रस्त

महाराष्ट्रातून गोव्याच्या हद्दीत घुसलेल्या ‘ओंकार’ हत्तीने शेती व बागायतीची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. तांबोसे येथे बागायतीत ‘ओंकार’ने उच्छाद मांडला आहे. परिसरातील बागायतींची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी व बागायतदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
24 mins ago
ओंकार हत्तीचा तांबोसे बागायतीत धुडगूस; शेतकरी त्रस्त

पेडणे : महाराष्ट्रातून गोव्याच्या हद्दीत घुसलेल्या ‘ओंकार’ हत्तीने शेती व बागायतीची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. तांबोसे येथे बागायतीत ‘ओंकार’ने उच्छाद मांडला आहे. परिसरातील बागायतींची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे.  त्यामुळे स्थानिक शेतकरी व बागायतदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षाप्रमाणेच या वर्षीही ‘ओंकार’ हत्ती शेती, बागायतीचे मोठे नुकसान करणार असल्याची भीती स्थानिक शेतकरी, बागायतदारांना वाटू लागली आहे. त्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  या पार्श्वभूमीवर ओंकार हत्तीचा लवकरात लवकर बंदोबस्त करून बागायतदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक पंच दया गवंडी यांनी केली आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेऊन हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी सूचवणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा