वाळपई : येथील ठाणे रोडवरील मशिदीजवळ असलेल्या तांदळाच्या दुकानाला सोमवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. वाळपई अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून सुमारे ५ लाख रुपयांची मालमत्ता वाचवली.
पहाटे ५.१४ वाजता आगीची घटना घडली. त्यानंतर माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे रोडवरील मशिदीजवळ मोहम्मद शरीफ खान यांच्या मालकीच्या तांदळाच्या दुकानात आग लागली. दुकानातून धूर येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वाळपई एलएफएफ सतीश के. नाईक यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली.


