कोलवाळ कारागृहातील ड्रग्ज प्रकरण; कैदी योगेश मांद्रेकरला अटक

यापूर्वी आशा व रोविना या दोघांना अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 mins ago
कोलवाळ कारागृहातील ड्रग्ज प्रकरण; कैदी योगेश मांद्रेकरला अटक

म्हापसा: कोलवाळ कारागृहातील ड्रग्ज तस्करीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करताना योगेश मांद्रेकर या कैद्याला अटक केली आहे. यापूर्वी याप्रकरणी जीएचआरडीसीची सुरक्षारक्षक आशा चोडणकर व कैदी रोविना लोबो या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. 

आशा चोडणकर व डबल मर्डरप्रकरणातील कैदी रोविना याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी  योगेश मांद्रेकर याला अटक केली. कारागृहात ड्रग्ज कसे पोहोचले, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या तस्करीचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणातील पुढील तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

आशा चोडणकरची जामिनावर सुटका 

दरम्यान, वरीलप्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आलेली कैदी रोविना लोबोला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जीएचआरडीसीची सुरक्षारक्षक आशा चोडणकरला सशर्त जामीनावर सोडण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.  

हेही वाचा
सर्व पहा