पेडणे : गेल्या दोन दिवसांपासून ओंकार हत्तीचा परिसरात धुमाकूळ सुरूच आहे. आज सकाळी तांबोसे येथील तुळशीदास शिरोडकर यांच्या बागायतीचे नुकसान केले.
हत्तीने बागायतीतील माड, केळी उमटून टाकल्या. हत्तीच्या या वाढत्या उपद्रवामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याने; चिंता व्यक्त केली जात आहे. ओंकारच्या सततच्या वावरावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.


