जमीन हडप प्रकरणातील आरोपी सुलेमान, आसिफ यांच्या घरांवर ईडीचे छापे

जमीन हडप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) संबंधित आरोपींच्या घरांवर छापेमारी केली आहे. जमीन हडप प्रकरणातील आरोपी सिध्दीकी उर्फ सुलेमान खान याच्या कारवार येथील घरावर तर आसिफ सौदागर याच्या माडेल-थिवी येथील घरावर ईडीने छापा टाकला.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
37 mins ago
जमीन हडप प्रकरणातील आरोपी सुलेमान, आसिफ यांच्या घरांवर ईडीचे छापे

पणजी : जमीन हडप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) संबंधित आरोपींच्या घरांवर छापेमारी केली आहे. जमीन हडप प्रकरणातील आरोपी सिध्दीकी उर्फ सुलेमान खान याच्या कारवार येथील घरावर तर आसिफ सौदागर याच्या माडेल-थिवी येथील घरावर ईडीने छापा टाकला.

या कारवाईदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित ठिकाणी कागदपत्रे आणि इतर महत्त्वाच्या बाबींची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती आहे. जमीन व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे तसेच आर्थिक व्यवहारांचा तपास या कारवाईतून केला जात असल्याचे समजते.

जमीन हडप प्रकरणाशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी ईडीकडून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या छापेमारीत नेमके काय हाती लागले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. 


(बातमी डेव्हलप होत आहे.) 

हेही वाचा
सर्व पहा