वेर्णा : वेर्णा येथे रेल्वे मार्गावर रो-रो (Ro-Ro) वॅगन रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने काम हाती घेतले.
सुमारे चार तासांच्या प्रयत्नांनंतर रो-रो घसरल्याने अडकलेला रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली. दरम्यान, वॅगन रुळावरून घसरण्याचे नेमके कारण तसेच या घटनेत रेल्वे मार्गाचे किंवा अन्य कोणते नुकसान झाले आहे का, याबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.


