बागा येथे समुद्रात बुडून मच्छिमाराचा मृत्यू

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
बागा येथे समुद्रात बुडून मच्छिमाराचा मृत्यू

म्हापसा : बागा येथील समुद्रात मासेमारी बोट मधून कोसळून आग्नेल फर्नांडिस (रा. सावतावाडा, कळंगुट) या मच्छीमाराचा  मृत्यू झाला. 

ही घटना गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. बागा समुद्रकिनाऱ्यावर नेहमीप्रमाणे बोटीतून मयत  फर्नांडिस हे त्यांचे भाऊ व कामगार खलाशांसोबत मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासेमारी करून किनारी परत येताना त्यांना अचानक फिट आली. त्यामुळे तोल जाऊन ते समुद्रात पडले आणि पाण्यात बुडाले. 

त्यांना तातडीने पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा पंचनामा कळंगुट पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रजित मांद्रेकर यांनी केला व मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठवून दिला आहे.

हेही वाचा
सर्व पहा