झुआरीनगर परिसरातील रस्ते खड्डेमय; कॉंग्रेस नेत्याने स्वखर्चातून बुजवले खड्डे

झुआरीनगर-कुठ्ठाळी परिसरातील रस्ते खड्डेमय बनले आहेत. मोठमोठे खड्डे बुजवण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्ष कृती झाली नाही. त्यामुळे कॉंग्रेस नेते महेश नाडर यांनी अखेर स्वत: पुढाकार घेऊन खड्ड्यांमध्ये सिमेंट कॉंक्रीट टाकून ते बुजवण्याचे काम सुरू केले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
10 hours ago
झुआरीनगर परिसरातील रस्ते खड्डेमय; कॉंग्रेस नेत्याने स्वखर्चातून बुजवले खड्डे

वास्को : झुआरीनगर-कुठ्ठाळी परिसरातील रस्ते खड्डेमय बनले आहेत. मोठमोठे खड्डे बुजवण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्ष कृती झाली नाही. त्यामुळे कॉंग्रेस नेते महेश नाडर यांनी अखेर स्वत: पुढाकार घेऊन खड्ड्यांमध्ये सिमेंट कॉंक्रीट टाकून ते बुजवण्याचे काम सुरू केले.  

स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना खराब रस्त्यांमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येकडे आमदार, जिल्हा पंचायत सदस्य तसेच निवडून आलेल्या पंचायत प्रतिनिधींचे लक्ष वेधूनही ठोस उपाययोजना न झाल्याने खड्डे बुजवण्याचे काम हाती घ्यावे लागल्याचे नाडर यांनी सांगितले. 

सुरक्षित आणि सुस्थितीतील रस्ते उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, सत्ताधारी भाजप सरकारशी संबंध‌ित लोकप्रतिनिधींकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नाडर यांनी केला.  नागरिकांना खराब रस्त्यांमुळे आणखी त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाची वाट न पाहता स्वतःच्या खर्चाने खड्डे बुजवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे नाडर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा