नेपाळ-तिबेटमधील भीषण पुरातील मृतांचा आकडा ३३२ वर

१३३ भारतीयांसहीत १,३०० जण बेपत्ता; नेपाळ-तिबेट सीमेवरील भागात अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. मृतांचा आकडा १६० वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत १,३०० हून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता असलेल्यांमध्ये १३३ भारतीय नागरिकांबरोबरच परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातील पर्यटकही बेपत्ता आहेत.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
11 hours ago
नेपाळ-तिबेटमधील भीषण पुरातील मृतांचा आकडा ३३२ वर

काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवरील भागात अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे.  मृतांचा आकडा ३३२ वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत १,३०० हून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता असलेल्यांमध्ये १३३ भारतीय नागरिकांबरोबरच  परदेशी नागरिकांचा समावेश आहे.  ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातील पर्यटकही बेपत्ता आहेत. 


नेपाळ पर्यटन बोर्डाच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये बेपत्ता व्यक्तींची संख्या ३८४ वरून ४०३ झाली आहे. यापैकी ३४१ जण परदेशी नागरिक आहेत. त्यात अमेरिकेचे ४७, ऑस्ट्रेलियाचे ३४ आणि कॅनडाचे २४ नागरिक आहेत. ब्रिटनचे ३३ पर्यटक बेपत्ता असल्याची शक्यता असून त्यात एका १३ वर्षीय मुलीचाही समावेश आहे.

तिबेटमधील ग्यिरॉन्ग काउंटी परिसरात ५५० जण बेपत्ता

दरम्यान, तिबेटमधील ग्यिरॉन्ग काउंटी परिसरात सुमारे ५५० जण बेपत्ता असल्याचे चीनच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. या भागात किमान तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.


नद्यांना महापूर; पूल, घरे वाहून गेली

बोटेकोशी नदीच्या परिसरात पुराच्या पाण्याने अक्षरशः हाहाकार माजवला. पाण्याचा प्रचंड लोंढा नदीकाठच्या वस्त्यांमध्ये घुसल्याने पूल, घरे आणि अन्य पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. पुराचे धक्कादायक व्हिडिओही समोर आले आहेत. हिमालयीन भागातील वाढत्या तापमानामुळे हिमनदीतील हिमस्खलन झाल्याने अचानक पूर आल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नेपाळ प्रशासनाने अनेक जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बोटेकोशी, त्रिशूली आणि नारायणी नद्यांच्या काठापासून दूर राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. बचाव व शोधमोहीम सुरू असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा
सर्व पहा