नेपाळमध्ये गोव्यातील कोणी बेपत्ता असल्यास माहिती देण्याचे प्रशासनाचे आवाहन

तिबेट मध्ये झालेल्या भूकंपानंतर वाहत येणाऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे नेपाळमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. त्यात सुमारे ४०० जण बेपत्ता आहेत तर काहीजणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अनेक भारतीयांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील कुणी नागरिक बेपत्ता असल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन गोवा प्रशासनाने केले आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
6 mins ago
नेपाळमध्ये गोव्यातील कोणी बेपत्ता असल्यास माहिती देण्याचे प्रशासनाचे आवाहन

मडगाव/म्हापसा : तिबेट  मध्ये झालेल्या भूकंपानंतर वाहत येणाऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे नेपाळमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. त्यात सुमारे ४०० जण बेपत्ता आहेत तर काहीजणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अनेक भारतीयांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील कुणी नागरिक बेपत्ता असल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन गोवा प्रशासनाने केले आहे. दक्षिण गोव्यातील कोणताही नागरिक नेपाळमध्ये बेपत्ता असल्यास किंवा त्याच्याशी संपर्क होत नसल्यास, त्याची माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी, असे आवाहन दक्षिण गोवा पोलीस व जिल्हा प्रशासनाने केले आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनीही  नेपाळमधील आपत्तीत उत्तर गोव्यातील कुणी बेपत्ता असल्यास त्याची माहिती देण्याची सूचना सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. 

बेपत्ता व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, कायमस्वरूपी पत्ता तसेच उपलब्ध असल्यास कुटुंबीयांचे संपर्क क्रमांक प्रशासनाकडे देण्याची विनंती करण्यात आली आहे. ही माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा दक्षिण गोवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून देता येणार आहे.


दक्षिण गोवा जिल्हा नियंत्रण कक्षासाठी ०८३२-२७९४१००, दक्षिण गोवा पोलीस नियंत्रण कक्षासाठी ७८७५७५६११०, तर आपत्कालीन मदतीसाठी ११२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.


नागरिकांकडून प्राप्त होणारी माहिती तातडीने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यास तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यास मदत होणार आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध असल्यास नागरिकांनी विलंब न करता प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा