पणजी : खोर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच गोरखनाथ केरकर आणि त्यांची पत्नी उपसरपंच सुप्रिया केरकर यांना अपात्र ठरविण्याचा आदेश तिसवाडीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) अनिल धुमस्कर यांनी दिला आहे. या निर्णयामुळे खोर्ली पंचायतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बीडीओंच्या या आदेशामुळे केरकर दाम्पत्याला सरपंच व उपसरपंचपद गमवावे लागणार आहे. बीडीओंच्या आदेशामुळे खोर्ली पंचायतीतील सत्तासमीकरणावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


