नेपाळमध्ये पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून साहित्य लुटण्याचे प्रकार

‘आपदा में अवसर’! साधण्याच्या या प्रकारांची सोशल मिडियावर मोठी चर्चा; नेपाळमध्ये भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना माणुसकीला काळिमा फासणारे काही प्रकार समोर येत आहेत. पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या वस्तू, गॅस सिलिंडर आणि इतर साहित्य गोळा करण्यासाठी काहीजण अक्षरशः जीव धोक्यात घालत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
8 hours ago
नेपाळमध्ये पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून साहित्य लुटण्याचे प्रकार

काठमांडू : नेपाळमध्ये भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना माणुसकीला काळिमा फासणारे काही प्रकार समोर येत आहेत. पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या वस्तू, गॅस सिलिंडर आणि इतर साहित्य गोळा करण्यासाठी काहीजण अक्षरशः जीव धोक्यात घालत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

वस्तूंवर डल्ला मारण्याचा प्रकार संतापजनक 

पूरस्थिती गंभीर असताना मदतकार्य आणि बचाव मोहिमेला प्राधान्य देण्याऐवजी वाहून आलेल्या वस्तूंवर डल्ला मारण्याचा हा प्रकार संतापजनक ठरत आहे. वेगवान पाण्याच्या प्रवाहात कोणत्याही क्षणी जीवितहानी होण्याची शक्यता असतानाही काहीजण साहित्य गोळा करताना दिसत आहेत.


‘आपदा में अवसर’ साधण्याच्या प्रकाराची सोशल मीडियावर चर्चा 

आपत्तीच्या काळात एकमेकांना मदत करण्याची गरज असताना ‘आपदा में अवसर’ साधण्याचा हा प्रकार सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे. प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्यात प्रवेश न करण्याचे आणि वाहून आलेल्या वस्तूंना हात न लावण्याचे आवाहन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा
सर्व पहा