पर्वरीतील कॅसिनो संचालकावरील गोळीबारप्रकरण : घटनास्थळावरून काडतुसे जप्त

पोलीस महासंचालक आलोक कुमार यांची माहिती; पर्वरीतील ‘निओ मॅजेस्टिक’ येथे कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी अद्याप कोणत्याही संशयिताला ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र, या तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांची विविध पथके तयार करून कामाला लावली आहेत. घटनास्थळावरून काडतुसांच्या नळकांड्या (बुलेट शेल्स) जप्त करण्यात आल्या आहेत.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 mins ago
पर्वरीतील कॅसिनो संचालकावरील गोळीबारप्रकरण : घटनास्थळावरून काडतुसे जप्त

पणजी : पर्वरीतील ‘निओ मॅजेस्टिक’ येथे कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी अद्याप कोणत्याही संशयिताला ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र, या तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांची विविध पथके तयार करून कामाला लावली आहेत. घटनास्थळावरून काडतुसांच्या नकांड्या (बुलेट शेल्स) जप्त करण्यात  आल्या आहेत. 

पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी वरील माहिती ‌दिली. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी तेथून काडतुसांच्या नळकांड्या (बुलेट शेल्स) जप्त केल्या आहेत. या प्रकरणात  सर्व शक्यता तपासल्या जात असून, गोळीबारामागील नेमके कारण आणि हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध दिशेने तपास सुरू केला आहे. उपलब्ध धागेदोरे, पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे. याप्रकरणातील आरोपींना लवकरच गजाआड करणार असल्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले. 

 काल शुक्रवारी रात्री ९.१५ वाजता वरील गोळीबाराचे प्रकरण घडले होते. ‘निओ मॅजेस्टिक’ कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. कॅसिनोच्या मागील बाजूला दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी हे कृत्य केले. त्यावेळी श्रीनिवास नायक सुरक्षारक्षकांसोबत आपल्या कारकडे जात होते व गाडीत बसण्याच्या प्रयत्नात होते. त्याच वेळी हा गोळीबार करण्यात आला. मात्र श्रीनिवास नायक व त्यांचे सुरक्षारक्षक या हल्ल्यातून वाचले. गोळीबाराच्या घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून धागेदोरे गोळा करत तपासाला गती दिली. ‍

दरम्यान, हल्ल्यानंतर दोघे हल्लेखोर दोन वेगवेगळ्या दिशेने जात असताना सीसीटीव्हीत टिपले गेले आहेत. त्यानंतर जवळच उभ्या करून ठेवलेल्या दुचाकीवरून ते पसार झाले. या माहितीवरून लवकरच हल्लेखोरांना गजाआड करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

हेही वाचा
सर्व पहा