आर.जी.कर रुग्णालयातील बलात्कार, हत्याप्रकरण; टीएमसीचे माजी आमदार घोष याला अटक

पुरावे नष्ट करणे, कट रचणे आणि दबाव आणल्याचा आरोप

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
13th August, 06:15 pm
आर.जी.कर रुग्णालयातील बलात्कार, हत्याप्रकरण;  टीएमसीचे माजी आमदार घोष याला अटक

कोलकाता : आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बलात्कार व हत्या प्रकरणातील पीडित डॉक्टरवर घाईघाईने अंत्यसंस्कार केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षाचे माजी आमदार निर्मल घोष यांना अटक गुरुवारी ओडिशातून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोष यांच्यावर पुरावे नष्ट करणे, गुन्हेगारी कट रचणे आणि एखाद्या व्यक्तीला तिच्या इच्छेविरुद्ध कृत्य करण्यास भाग पाडणे, या आरोपांखाली कारवाई करण्यात आली.

पीडित डॉक्टरच्या वडिलांनी सोमवारी खरदह पोलिस ठाण्यात नव्याने तक्रार दाखल केली होती. आपल्या मुलीच्या मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यासाठी दबाव आणणाऱ्या तीन व्यक्तींमध्ये निर्मल घोष यांचाही समावेश असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

दरम्यान, रविवारी पानिहाटी येथे पीडित डॉक्टरच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमाला उपस्थित असताना मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी बॅरकपूर पोलीस आयुक्तांना या कथित घाईघाईच्या अंत्यसंस्कार प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या चौकशीनंतर निर्मल घोष याला अटक करण्यात आली. 

हेही वाचा
सर्व पहा