लोकसभा, राज्यसभा कामकाज अनिश्चितकाळासाठी तहकूब;

वादळी पावसाळी अधिवेशनाची सांगता

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
13th August, 01:24 pm
लोकसभा, राज्यसभा कामकाज अनिश्चितकाळासाठी तहकूब;

नवी दिल्ली : वारंवार घालण्यात आलेला गोंधळ आणि तहकुबीच्या घटनांमुळे चर्चेत राहिलेले संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी संपले. राज्यसभेचे (Rajya Sabha) कामकाज अनिश्चितकाळासाठी (Sine Die) तहकूब करण्यात आले. यापूर्वी लोकसभेचे  (Lok Sabha)  कामकाजही अनिश्चितकाळासाठी तहकूब करण्यात आले.

सामान्य वेळापत्रकापेक्षा वेगळ्या पद्धतीने राज्यसभेत गुरुवारी प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहर न घेता खाण व खनिजे सुधारणा विधेयकावर चर्चा केली. हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.

विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी पावसाळी अधिवेशनातील सभागृहाच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि त्यानंतर कामकाज अनिश्चितकाळासाठी तहकूब केले.

२० जुलैपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई, अयोध्येतील राम मंदिरातील देणग्यांच्या कथित चोरीसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले.

दरम्यान, या अधिवेशनात केंद्र सरकारने अनेक विधेयके सभागृहात मंजूर करून घेतली. गुरुवारी राज्यसभेचे कामकाज संपल्यानंतर पावसाळी अधिवेशनाची औपचारिक सांगता झाली.

हेही वाचा
सर्व पहा