नागरिकांची आर्थ‌िक फसवणूक करणारी ३, ७१८ मोबाईल अ‍ॅप्स केंद्राकडून ब्लॉक

१५.७५ लाखांहून अधिक सिमकार्डवरही बंदी सीएफसीएफआरएमएसमुळे फसवणुकीपासून ११,१५८ कोटी वाचवले

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
16 mins ago
नागरिकांची आर्थ‌िक फसवणूक करणारी ३, ७१८ मोबाईल अ‍ॅप्स केंद्राकडून ब्लॉक

नवी दिल्ली : नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या फसव्या कर्ज अ‍ॅप्ससह तब्बल ३,७१८ मोबाइल अ‍ॅप्स केंद्र सरकारने ब्लॉक केले आहेत. १५.७५ लाखांहून अधिक सिमकार्ड आणि ५.७७ लाख आयएमईआय (IMEI) क्रमांकही ब्लॉक केले आहेत.

केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी लोकसभेत ही माहिती दिली. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने १४ सी (I4C) माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० मधील कलम ६९(अ) आणि ७९(३)(ब) अंतर्गत ही कारवाई केली आहे. ३० जून २०२६ पर्यंत ३,७१८ अ‍ॅप्स ब्लॉक करण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले.

याशिवाय विविध पोलीस यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने १५.७५ लाखांहून अधिक सिमकार्ड आणि ५.७७ लाख आयएमईआय (IMEI)  क्रमांकही ब्लॉक केले आहेत.

सीएफसीएफआरएमएसमुळे फसवणुकीपासून ११,१५८ कोटी वाचवले 

दरम्यान, आर्थिक सायबर फसवणुकीची तातडीने नोंद करण्यासाठी २०२१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या १४ सीच्या  ‘सिटिझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टिम’ (सीएफसीएफआरएमएस CFCFRMS)  मुळे आतापर्यंत ११,१५८ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वाचवण्यात यश आले आहे. सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून डिजिटल प्लॅटफॉर्म, सिमकार्ड आणि मोबाइल उपकरणांवर कारवाई अधिक तीव्र करण्यात येत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

हेही वाचा
सर्व पहा