कोलवाळ कारागृहाचे सहाय्यक जेलर रामनाथ गावडे यांची आत्महत्या

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
28 mins ago
कोलवाळ कारागृहाचे सहाय्यक जेलर रामनाथ गावडे यांची आत्महत्या

पणजी : कोलवाळ केंद्रीय कारागृहाचे सहाय्यक जेलर रामनाथ पंढरी गावडे यांनी फोंडा येथील त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या निधनामुळे कारागृह प्रशासनासह साहित्यविश्वातही शोककळा पसरली आहे.

रामनाथ गावडे हे 'डॉ. आर. पी. गावडे' या नावाने साहित्य क्षेत्रात परिचित होते. त्यांनी लेखक, कवी आणि साहित्यिक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या साहित्यकृतींना वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, कामाच्या वाढत्या तणावामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी स्वेच्छानिवृत्तीसाठी (VRS) अर्ज केला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी तो अर्ज मागे घेत पुन्हा सेवेत राहण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, शुक्रवारी त्यांच्या फोंडा येथील राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा