काशिनाथ शेट्येंच्या तक्रारीची एसपीसीएकडून गंभीर दखल

पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
काशिनाथ शेट्येंच्या तक्रारीची एसपीसीएकडून गंभीर दखल

पणजी : काशिनाथ शेट्ये यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत एसपीसीएने (SPCA) जुने गोवे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गौरेश मळीक आणि पोलीस उपनिरीक्षक संकेत पोखरे यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणातील तक्रारीवर ७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.  संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याच प्रकरणात गुन्हा शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता, अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, जिवबा दळवी तसेच पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनाही एसपीसीएने नोटीस बजावली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून तक्रारीबाबत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.  सुनावणीदरम्यान या प्रकरणाची सविस्तर छाननी करण्यात येणार आहे. या नोटिसांमुळे संबंधित प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.  सुनावणीत एसपीसीएकडून कोणते निर्देश दिले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा