पणजी : गोव्यातील महत्त्वाच्या जलस्रोतांपैकी एक असलेले साळावली धरण (Selaulim Dam) गुरुवारी (३० जुलै) दुपारी ३.३० वाजता पूर्ण क्षमतेने भरले. धरण परिसरात पडलेल्या पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात सातत्याने वाढ होत होती. शेवटी आज गुरुवारी दुपारी धरण शंभर टक्के भरून पाणी बाहेर वाहू लागले.
साळावली धरण पूर्ण भरल्याने दक्षिण गोव्यातील अनेक तालुक्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सिंचन तसेच औद्योगिक वापरासाठी आवश्यक जलसाठा उपलब्ध राहण्यास मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी संबंधित यंत्रणा आवश्यक ती पावले उचलत आहेत.धरण पूर्ण क्षमतेने भरल्याची माहिती गुरुवारी दुपारी अधिकृतरीत्या नोंदविण्यात आली असून, हा जलसाठा समाधानकारक मानला जात आहे.


