गोवा कोकणी अकादमीचे पुरस्कार जाहीर : जयंती नायक यांना साहित्य प्रज्ञा पुरस्कार

पणजी : गोवा कोंकणी अकादमीतर्फे दिले जाणारे वर्ष २०२५ आणि २०२६ चे विविध राज्यस्तरीय साहित्य व सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात २०२५ च्या साहित्य प्रतिभा पुरस्कारासाठी ज्येष्ठ साहित्यिक पुंडलिक नायक, तर साहित्य प्रज्ञा पुरस्कारासाठी डॉ. जयंती नायक यांची निवड झाली आहे. २०२६ या वर्षासाठीचा साहित्य प्रतिभा पुरस्कार देविदास कदम, तर साहित्य प्रज्ञा पुरस्कार भालचंद्र गावकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच भांगरभूंयचे संपादक महेश दिवेकर यांना २०२५ चा कोंकणी प्रसार माध्यम कौशल्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
पणजी येथील गोवा कोंकणी अकादमीच्या शणै गोंयबाब सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत अकादमीचे अध्यक्ष पूर्णानंद च्यारी यांनी या पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली.
हे सर्व पुरस्कार २० ऑगस्ट २०२६ रोजी कोंकणी राष्ट्रमान्यता दिनाचे औचित्य साधून इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित विशेष सोहळ्यात प्रदान केले जातील. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तर सन्माननीय अतिथी म्हणून गुजरात साहित्य अकादमीचे अध्यक्ष भाग्येश झा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
साहित्य प्रतिभा आणि साहित्य प्रज्ञा पुरस्काराचे स्वरूप ५०,००० रुपये रोख, स्मरणचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे आहे. तर इतर सर्व पुरस्कारांसाठी २५,००० रुपये रोख, स्मरणचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ दिले जाणार आहे.
वर्ष २०२५ चे कोंकणी साहित्य पुरस्कार मानकरी कविता : ‘यादींचो गांव’ : चेतन आचार्य, कथा / कादंबरी : ‘विद्वाट’ : वामन गोविंद टाकेकर, नाट्य लेखन : ‘सरण जळटना’ : दीपराज सातार्डेकर, निबंध / प्रवासवर्णन : ‘कांटेकणगां’ : अभयकुमार वेलिंगकर, संशोधन / समीक्षा : ‘खण वेवसायाचेर आदारीत साहित्य: समाजशास्त्र चिकित्सा’ : डॉ. भूषण भावे, बालसाहित्य : ‘माणकुलीं आनी शिस्त’ : श्रद्धा गरड, अनुवाद : ‘जगावेगळो’ : अमिता आगशीकर गोव्याबाहेरील कोंकणी लेखक : ‘धांपल्लीं घडितां’ : स्टेन आगेरा (मंगळुरू, कर्नाटक)
२०२५ चे इतर भाषा व कला सेवा पुरस्कार: युवा चैतन्य पुरस्कार : चेतन खेडेकर व रोमन रॉड्रिग्स, प्रसार माध्यम कौशल्य पुरस्कार : महेश दिवेकर (संपादक, भांगरभूंय), शणै गोंयबाब कोंकणी भाषा सेवा पुरस्कार : आर. बी. एस. कोमरपंत, माधव मंजुनाथ शानभाग कोंकणी भाषा सेवा पुरस्कार : डॉ. चंद्रशेखर णै, कोंकणी कला सेवा पुरस्कार : सी. डिसिल्वा, कोंकणी डिजिटल कला सेवा पुरस्कार : जॉन आगियार, कोंकणी सेवा संस्था पुरस्कार : डिचोली कोंकणी सेवा केंद्र, डिचोली.
वर्ष २०२६ चे कोंकणी साहित्य व सेवा पुरस्कार मानकरी: कविता : ‘हांव वाचूंक सोदतां म्हजी वळख’ : समीर झाटये, कथा / कादंबरी : ‘मम्मी’ : आगुस्त बार्रेटो, नाट्य लेखन : ‘होम मिनिस्टर’ : सुशांत लक्ष्मीकांत नाईक, निबंध / प्रवासवर्णन : ‘शाय आनी अंतरदृष्टी’ : एच. मनोज, संशोधन / समीक्षा : ‘कोंकणी चम्पू काव्य. गायत्री देवी: भोव आनी प्रभाव’ : प्रियादर्शनी तडकोडकर, बालसाहित्य : ‘मिंटू करता मज्जा’ : फिलोमेना सांफ्रांसिस्को, अनुवाद : ‘हाजी अलीची फुलकान्न आनी हेर काणयो’ : स्नेहलता भाटीकर, गोव्याबाहेरील कोंकणी लेखक : ‘आमगेल कारवार’ : संदेश बांदेकर (कारवार)
२०२६ चे इतर भाषा व कला सेवा पुरस्कार:
युवा चैतन्य पुरस्कार : शलाका देसाई व रजत हेगडे, प्रसार माध्यम कौशल्य पुरस्कार : लौकीक शिलकर (प्रुडंट मीडिया), शणै गोंयबाब कोंकणी भाषा सेवा पुरस्कार : उल्हास यशवंत नायक, माधव मंजुनाथ शानभाग कोंकणी भाषा सेवा पुरस्कार : टी. आर. सदानंद भट, कोंकणी कला सेवा पुरस्कार : प्रिन्स जॅकब, कोंकणी डिजिटल कला सेवा पुरस्कार : माहिम भंडारी (गोवा स्टोरीज), कोंकणी सेवा संस्था पुरस्कार : अंत्रूज घुडयो (बांदोडा - फोंडा)