Home >> गोवा >> तोरसे पंचायतीच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव

तोरसे पंचायतीच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव

बाबू आजगावकरना दिलेली साथ भोवल्याची चर्चा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
तोरसे पंचायतीच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव

पेडणे : तोरसे ग्रामपंचायतीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे.  उपसरपंच उत्तम वीर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या सर्व सहा सदस्यांनी या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्याने उपसरपंचांवरील नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे. त्यामुळे गावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुढील विधानसभा निवडणुकीची तयारी करीत असलेले माजीमंत्री बाबू आजगावकर यांना दिलेली साथ भोवल्याची चर्चा याठिकाणी आहे. 

अविश्वास ठरावावर सरपंच पूजा साटेलकर यांच्यासह पंचसदस्य रमेश बुटे, आत्माराम तोरस्कर, प्रार्थना मोटे, स्वाती तोरस्कर आणि छाया शेट्ये यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सर्व सदस्यांनी एकत्र येत हा निर्णय घेतल्याने ग्रामपंचायतीतील अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा रंगली आहे.

स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार, उपसरपंचांची अलीकडील कार्यपद्धती, निर्णय प्रक्रिया आणि सहकार्याच्या अभावामुळे सदस्यांमध्ये नाराजी वाढत गेली. याच पार्श्वभूमीवर अखेर त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

बाबू आजगावकर यांच्याशी असलेली जवळीक भोवली 

दरम्यान, स्थानिक राजकीय वर्तुळात आणखी एका मुद्द्याची चर्चा रंगली आहे. उपसरपंचांची बाबू आजगवाकर यांच्याशी असलेली कथित राजकीय जवळीक त्यांच्यासाठी अडचणीची ठरल्याचे  राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या संबंधामुळे ग्रामपंचायतीतील वातावरण बिघडल्याचा आरोपही चर्चेत आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.


हेही वाचा
सर्व पहा