
साहित्य : ४-५ उकडलेले बटाटे, २ गोल स्लाईस चिरलेले कांदे, २ गोल स्लाईस चिरलेले टोमॅटो, १ बारीक चमचा मोहरी, ८–१० कढीपत्त्याची पाने, ४–५ लसूण पाकळ्या (ठेचलेल्या), २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या , १ बारीक चमचा हळद, मीठ चवीनुसार , बारीक चिरलेली कोथिंबीर, २ मोठी वाटी बेसन, चिमूटभर ओवा, पाणी , चिमूटभर हिंग , तिखतीनुसार लाल तिखट , हिरवी चटणी, लसूण चटणी
कृती : एका कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात कढीपत्ता, कांदा, लसूण आणि मिरची परता. कांद्याला सोनेरी रंग आला की त्यात हळद, उकडलेले बटाटे, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून सारण तयार करा.
आता बेसनात हळद, हिंग, ओवा,vलाल तिखट चवीनुसार मीठ, आणि कोथिंबीर घाला. या पिठात हळूहळू पाणी घालून गुठळ्या न होता पीठ तयार करा. तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा आणि एक डाव मिश्रण तव्यावर घालून हलक्या हाताने गोल पसरवा. जरा जाडसर ठेवा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. आता हा डोसा एका बाजूला काढून त्यावर हिरवी चटणी, लसूण चटणी, कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचे सारण घालून रोल करा. हे बेसन रोल टोमॅटो सॉस सोबत खूप चविष्ट लागतात.
- संचिता केळकर