Home >> गुन्हे >> आईच्या दागिन्यांची चोरी करून मुलीने प्रियकारासह काढला पळ

आईच्या दागिन्यांची चोरी करून मुलीने प्रियकारासह काढला पळ

मुलीविरोधात वेर्णा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
19th July, 09:12 pm
आईच्या दागिन्यांची चोरी करून मुलीने प्रियकारासह काढला पळ

वास्को : आईने विश्वासाने स्वाधीन केलेले दागिन्यांची चोरी करून प्रियकारासह पळ काढणाऱ्या मुलीविरोधात वेर्णा पोलीस स्थानकात दाखल झाली आहे. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांकवाळ येथील एका महिलेने आपल्या मुलीविरोधात तक्रार केली आहे. सदर महिला उपचारासाठी इस्पितळात दाखल झाल्यावर तिने आपले दागिने मुलीकडे सांभाळण्यासाठी दिले होते. त्या मुलीने ते दागिने कपाटात ठेवले होते. मात्र, त्या मुलीच्या प्रियकाराला कपाटात दागिने असल्याचे समजताच त्याने ते दागिने चोरण्यासाठी तिला प्रोत्साहन दिले. त्याच्या सांगण्यावरून त्या मुलीने त्या कपाटातील दागिन्यांची चोरी केली. त्यानंतर ती आपल्या प्रियकारासह पळून गेली. त्या मुलीने चोरलेले दागिने एका फायनान्स बँकेत प्रियकराच्या नावाने गहाण ठेवून कर्ज घेतले. मिळालेली रक्कम त्यांनी आपल्या वैयक्तिक वापरासाठी वापरली. यामुळे आपले दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्या महिलेने केला आहे.
सदर चोरीची घटना फेब्रुवारी २०२६ ते १० मार्च २०२६ या दरम्यान घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजदत्त आर्सेकर पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा