Home >> क्रीडा >> स्पेन फुटबॉलचा नवा 'बादशाह'; अर्जेंटिनाचा १-० ने पराभव

स्पेन फुटबॉलचा नवा 'बादशाह'; अर्जेंटिनाचा १-० ने पराभव

स्पेनच्या ९०% अचूक पासिंगसमोर गतविजेत्या अर्जेंटिनाचा बचाव फिका पडला. २०१० नंतर स्पेनचे हे दुसरे विश्वविजेतेपद; नव्या सुवर्णपिढीचा उदय.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th July, 12:28 pm
स्पेन फुटबॉलचा नवा 'बादशाह'; अर्जेंटिनाचा १-० ने पराभव

न्यू जर्सी : अख्ख्या जगाला वेड लावणाऱ्या 'फिफा विश्वचषक २०२६' चा नवा जगज्जेता मिळाला आहे. युरोपियन चॅम्पियन असणाऱ्या स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा १-० असा पराभव करत तब्बल १६ वर्षांनंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले. २०१० नंतर स्पेनचे हे दुसरे विश्वविजेतेपद ठरले. १२० मिनिटे रंगलेल्या या श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात, अतिरिक्त वेळेत स्पेनने केलेल्या एका मैदानी गोलने मेस्सीचे दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.


Spanish players lift the trophy and celebrate winning the 2026 World Cup  football tournament final match between Spain and Argentina at the New  York/New Jersey Stadium in East Rutherford on July 19,


स्पॅनिश 'टिकी-टाका'चे वर्चस्व; मेस्सीचा कडा पहारा

सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच स्पेनने आपल्या प्रसिद्ध 'पझेशन फुटबॉल'चा जलवा दाखवला. रोड्री, फॅबियन रुईझ आणि दानी ओल्मो यांनी मध्यफळीवर (Midfield) अशी काही पकड मिळवली की अर्जेंटिनाच्या खेळाडूंना चेंडू पास करणेही कठीण झाले. स्पेनकडे तब्बल ६८ टक्के चेंडूचा ताबा होता, तर अर्जेंटिना केवळ ३२ टक्क्यांवर मर्यादित राहिला. अर्जेंटिनाचा हुकमी एक्का लिओनेल मेस्सी संपूर्ण सामन्यात स्पेनच्या ३-३ बचावपटूंच्या कड्या पहाऱ्यात होता. स्पॅनिश मिडफिल्डर्सनी मेस्सीला एकही मोकळा शॉट मारण्याची संधी दिली नाही.


Spain 1-0 Argentina (aet): 2026 World Cup final player ratings | World Cup  2026 | The Guardian


मार्टिनेझचा लढा अपयशी, स्पेनचे ११ शॉट्स ऑन टार्गेट

आक्रमणाच्या बाबतीत स्पेन अत्यंत आक्रमक राहिला. स्पेनने गोलपोस्टवर एकूण २० शॉट्स मारले, ज्यातील ११ शॉट्स अगदी टार्गेटवर होते. अर्जेंटिनाचा गोलकिपर एमिलियानो मार्टिनेझ गोलपोस्टसमोर भिंतीसारखा उभा राहिला आणि त्याने अनेक उत्कृष्ट बचाव केले. याउलट, संपूर्ण १२० मिनिटांच्या खेळात अर्जेंटिनाला गोलपोस्टच्या चौकटीत (On Target) एकही शॉट मारता आला नाही. ८०३ यशस्वी पासेस आणि ९० टक्के अचूकतेच्या जोरावर स्पेनने सामन्याची दिशा पूर्णपणे नियंत्रित केली.


Emiliano Martinez sets World Cup finals saves record for Argentina


१०६ व्या मिनिटाला फेरान टोरेसचा मॅजिक गोल!

नियमित ९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोल करता आला नाही, त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. अखेर १०६ व्या मिनिटाला स्पेनने अर्जेंटिनाची अभेद्य भिंत भेदली. पेद्रो पोरोने उजव्या बाजूने टाकलेल्या अचूक क्रॉसवर निको विल्यम्सने शानदार हेडर असिस्ट दिला. बॉक्समध्ये दबावाखाली उभ्या असलेल्या फेरान टोरेसने कोणतीही घाई न करता, पहिल्याच टचमध्ये अप्रतिम फिनिशिंग करत चेंडू थेट जाळ्यात धाडला. या एका गोलने स्पेनला १-० ची निर्णायक आघाडी मिळवून दिली आणि संभाव्य पेनल्टी शूटआऊटचा धोकाही टाळला.


Spain's forward Ferran Torres celebrates scoring his team's first goal  during the 2026 World Cup football tournament final match between Spain and  Argentina at the New York/New Jersey Stadium in East Rutherford


सामन्यानंतर मैदानावर तुफान राडा; मेस्सीचे अश्रू

१२० व्या मिनिटाला रेफ्रीने अंतिम शिट्टी वाजवताच स्पॅनिश गोटात जल्लोष सुरू झाला. मात्र, हा पराभव अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या जिव्हारी लागला. स्पेनचे खेळाडू सेलिब्रेशन करत असताना अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिआंद्रो पारेदेस याचा संताप अनावर झाला. त्याचा स्पेनच्या एका खेळाडूसोबत वाद झाला आणि पारेदेसने थेट त्याचा गळा पकडला. यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले आणि मैदानावर काही काळ तुफान राडा पाहायला मिळाला. एकीकडे मैदानावर हा धिंगाणा सुरू असताना, फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सी मात्र पराभवाच्या दुःखात मैदानावर एका कोपऱ्यात बसून ढसाढसा रडताना दिसला.


Serious Chaos Erupts After The Final Whistle As A Fight Breaks Out Following  Spain's 1-0 Victory Over Argentina In The FIFA World Cup Final. Argentine  Players Was Seen Fighting With Some Spanish


आपल्या सर्वांग सुंदर खेळाने तरुणाईला खिळवून ठेवणाऱ्या लॅमिन यामाल, निको विल्यम्स, गावी, पाऊ कुब्रासी, पेड्री आणि उनाय सिमोन या स्पेनच्या नव्या गोल्डन जनरेशनने अखेर फुटबॉल विश्वावर आपले साम्राज्य प्रस्थापित केले आहे.

एमबाप्पेला 'गोल्डन बूट' तर रॉड्रीला 'गोल्डन बॉल'

या  स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

फ्रान्सच्या किलियन एमबाप्पेने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक गोल करत 'गोल्डन बूट' पुरस्कारावर नाव कोरले, तर विजेत्या स्पेन संघाचा स्टार खेळाडू रॉड्री याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून 'गोल्डन बॉल' पुरस्काराने गौरविण्यात आले.


Clean sweep for Spain 🧹🇪🇸 Golden Ball: Rodri Golden Glove: Unai Simón  Best Young Player: Pau Cubarsí


लिओनेल मेस्सीचे स्वप्न थोडक्यात हुकले

३९ वर्षांच्या लिओनेल मेस्सीला आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या टप्प्यात सर्वोच्च पुरस्कारावर हक्क मिळवण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, अंतिम सामन्यातील पराभव आणि अवघ्या २ गोलच्या फरकामुळे मेस्सीचे हे स्वप्न थोडक्यात अपूर्ण राहिले.

पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी (FIFA World Cup 2026 Award Winners):

 १. गोल्डन बूट विजेता

किलियन एमबाप्पे (फ्रान्स) — १० गोल (८ सामन्यांत)

(सर्वाधिक गोल करणारे खेळाडू):

किलियन एमबाप्पे (फ्रान्स) — १० गोल (८ सामन्यांत)

लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) — ८ गोल

ज्युड बेलिंगहॅम (इंग्लंड) — ७ गोल

एर्लिंग हालांड (नॉर्वे) — ७ गोल

हॅरी केन (इंग्लंड) — ६ गोल

उस्मान डेम्बेले (फ्रान्स) — ६ गोल

२. गोल्डन बॉल विजेते (स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू):

गोल्ड: रॉड्री (स्पेन)

सिल्वर: लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना)

ब्रॉन्झ: किलियन एमबाप्पे (फ्रान्स)

३. गोल्डन ग्लोव्ह विजेता (सर्वोत्तम गोलरक्षक):

उनाय सिमोन (स्पेन)

४. सर्वोत्तम युवा खेळाडू (Best Young Player):

पाऊ कुबार्सी (स्पेन)

फुटबॉल इतिहासातील सर्वात श्रीमंत वर्ल्ड कप; विजेत्या संघावर होणार ४३० कोटींचा वर्षाव!

फिफा विश्वचषक २०२६ हा केवळ मैदानावरील रोमांचक लढतींसाठीच नाही, तर विक्रमी बक्षीस रकमेच्या घोषणेमुळेही प्रचंड चर्चेत आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी फिफाने (FIFA) इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक तरतूद केली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या ४८ संघांसाठी एकूण आर्थिक वितरण जवळपास ८७१ दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे ७,५०० कोटी रुपयांहून अधिक) इतके करण्यात आले आहे. यामध्ये बक्षीस रक्कम, पात्रता अनुदान, पूर्वतयारीचे अनुदान आणि इतर आर्थिक सहाय्याचा समावेश आहे.


FIFA 2026 World Cup Prize Money Increase and Rule Changes | Hypebeast


विश्वविजेत्याला किती मिळणार?

फिफाने जाहीर केल्यानुसार, यंदाचा विश्वचषक जिंकणाऱ्या स्पेन संघाला ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे ४३० कोटी रुपये) इतकी विक्रमी बक्षीस रक्कम मिळणार आहे. ही रक्कम २०२२ च्या कतार विश्वचषकातील विजेत्या अर्जेंटिनाला मिळालेल्या ४२ दशलक्ष डॉलरपेक्षा लक्षणीय अधिक आहे. म्हणजेच, यंदाच्या विश्वविजेत्या संघाला यापूर्वीपेक्षा खूप मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.

उपविजेत्या अर्जेंटिनालाही कोट्यवधींचे बक्षीस

अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या उपविजेत्या संघालाही (अर्जेंटिना) मोठी रक्कम मिळणार आहे. फिफाच्या नियमानुसार उपविजेत्या संघाला ३३ दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे २८४ कोटी रुपये) दिले जातील. त्यामुळे अंतिम सामन्यातील दोन्ही संघ आर्थिकदृष्ट्याही मोठे विजेते ठरणार आहेत.

बक्षीस रकमेचे संपूर्ण वर्गीकरण (Rank-wise Prize Money):

विश्वविजेता: ५० दशलक्ष डॉलर (सुमारे ४३० कोटी रुपये)

उपविजेता: ३३ दशलक्ष डॉलर (सुमारे २८४ कोटी रुपये)

तिसरा क्रमांक: २९ दशलक्ष डॉलर (सुमारे २४९ कोटी रुपये)

चौथा क्रमांक: २७ दशलक्ष डॉलर (सुमारे २३२ कोटी रुपये)

उपांत्यपूर्व फेरी (५ ते ८ क्रमांक): प्रत्येकी १९ दशलक्ष डॉलर (सुमारे १६३ कोटी रुपये)

राऊंड ऑफ १६ (९ ते १६ क्रमांक): प्रत्येकी १५ दशलक्ष डॉलर (सुमारे १२९ कोटी रुपये)

राऊंड ऑफ ३२ (१७ ते ३२ क्रमांक): प्रत्येकी ११ दशलक्ष डॉलर (सुमारे ९४ कोटी रुपये)

ग्रुप स्टेजनंतर बाहेर पडलेले संघ (३३ ते ४८ क्रमांक): प्रत्येकी १० दशलक्ष डॉलर (सुमारे ८६ कोटी रुपये)



World Cup 2026: Power Ranking the 52 Teams Most Likely to Qualify - The  Ringer


प्रत्येक पात्र संघाला स्वतंत्र तयारी अनुदान

फिफाने स्पर्धेत पात्र ठरलेल्या प्रत्येक सदस्य संघटनेला २.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे २१.५ कोटी रुपये) तयारीसाठी स्वतंत्र अनुदान म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीचा वापर प्रशिक्षण शिबिरे, प्रवास, निवास आणि स्पर्धेपूर्वीच्या इतर खर्चासाठी केला जातो. याशिवाय, संघांच्या प्रतिनिधीमंडळासाठीच्या प्रवासाचा खर्चही फिफाकडून केला जातो.


FIFA World Cup 2026 in pictures: Top fan moments


२०२२ च्या तुलनेत बक्षीस रकमेत मोठी वाढ

कतारमध्ये झालेल्या २०२२ च्या विश्वचषकासाठी एकूण बक्षीस रक्कम ४४० दशलक्ष डॉलर होती. मात्र, २०२६ मध्ये स्पर्धेचा विस्तार ३२ वरून ४८ संघांपर्यंत झाल्यानंतर फिफाने पुरस्कार रकमेत मोठी वाढ केली. सुरुवातीला ७२७ दशलक्ष डॉलरच्या आर्थिक वितरणाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर स्पर्धेची वाढलेली व्याप्ती आणि व्यावसायिक उत्पन्नातील वाढ लक्षात घेऊन एप्रिल २०२६ मध्ये ही रक्कम वाढवून जवळपास ८७१ दशलक्ष डॉलर करण्यात आली.

ही बक्षीस रक्कम थेट कोणाला मिळते?

एक महत्त्वाची बाब म्हणजे ही बक्षीस रक्कम थेट खेळाडूंना दिली जात नाही. फिफा ही रक्कम संबंधित देशाच्या राष्ट्रीय फुटबॉल महासंघाला (Member Association) प्रदान करते. त्यानंतर, तो फुटबॉल महासंघ आपल्या धोरणानुसार खेळाडू, मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमध्ये बोनसचे वाटप करतो. त्यामुळे प्रत्येक देशात खेळाडूंना मिळणारी प्रत्यक्ष बोनसची रक्कम वेगवेगळी असू शकते.


Ranking the World Cup 2026 groups: Which teams are favourites to progress?  | World Cup 2026 News | Al Jazeera


४८ संघ, १०४ सामने आणि विक्रमी आर्थिक वितरण यामुळे फिफा विश्वचषक २०२६ हा फुटबॉलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि सर्वात श्रीमंत विश्वचषक ठरला आहे.

हेही वाचा
सर्व पहा