Home >> गोवा >> कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी गोव्यातील दोन आमदारांच्या निधनाच्या दोन घटना

कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी गोव्यातील दोन आमदारांच्या निधनाच्या दोन घटना

२०१७ च्या कार्यकाळात पर्रीकर, डिसोझा, २०२२ च्या कार्यकाळात रवी नाईक, जेनिफर यांचे निधन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 hours ago
कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी गोव्यातील दोन आमदारांच्या निधनाच्या दोन घटना

पणजी : विधानसभेचा कार्यकाळ (Goa assembly) पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे पाच वर्षांच्या आत एकामागून एक दोन आमदारांचे निधन (death of MLA) होण्याच्या घटना गोव्यात दोन वेळा घडल्या आहेत. २०१७ च्या विधानसभेच्या कार्यकाळात मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) आणि फ्रान्सिस डिसोझा (Francis D'souza) या दोन आमदारांचे निधन झाले होते. तर २०२२ च्या विधानसभेच्या कार्यकाळात रवी नाईक (Ravi Naik) आणि जेनिफर मोन्सेरात (Jennifer Monserrate) यांचे निधन झाले आहे.

आमदार किंवा मंत्री असताना सत्तेत असतानाच पाच आमदारांचे निधन झाले. यामध्ये स्व. भाऊसाहेब बांदोडकर आणि स्व. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री पदावर असतानाच त्यांचे निधन झाले होते. तर भाजपचे कुठ्ठाळीचे आमदार माथानी साल्ढाणा (Mathani Saldhana), म्हापसा येथील भाजप आमदार फ्रान्सिस डिसोझा, फोंडा येथील आमदार तसेच कृषीमंत्री रवी नाईक आणि आता ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन झाले आहे. यामध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी दोन आमदारांचे निधन होण्याच्या दोन घटनांची नोंद झाली आहे.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले पणजीचे आमदार मनोहर पर्रीकर आणि म्हापसा येथील आमदार फ्रान्सिस डिसोझा यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पाच वर्षांच्या आत त्यांचे निधन झाले. मनोहर पर्रीकर यांचे १७ मार्च २०१९ रोजी, तर १४ फेब्रुवारी २०१९ रोजी फ्रान्सिस डिसोझा यांचे निधन झाले होते. एका वर्षाच्या आत दोन आमदारांचे निधन होण्याची घटना ही पहिल्यांदाच घडली होती.

आता २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले फोंडा येथील आमदार रवी नाईक आणि ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पाच वर्षांच्या आत निधन झाले. रवी नाईक यांचे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले होते, तर आता १९ जुलै २०२६ रोजी जेनिफर मोन्सेरात यांचे निधन झाले आहे.

तिघांचे कर्करोगाने, तर दोघांचे हृदयविकाराने निधन

आमदार असताना निधन झालेल्या तीन आमदारांचे कर्करोगामुळे, तर तीन आमदारांचे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले. मनोहर पर्रीकर, फ्रान्सिस डिसोझा आणि जेनिफर मोन्सेरात यांचे कर्करोगामुळे, तर भाऊसाहेब बांदोडकर, माथानी साल्ढाणा आणि रवी नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 

हेही वाचा
सर्व पहा