Home >> गोवा >> मोरजी समुद्रकिनाऱ्यावर दुसऱ्या दिवशीही बेकायदा बांधकामांवर बुलडोझर

मोरजी समुद्रकिनाऱ्यावर दुसऱ्या दिवशीही बेकायदा बांधकामांवर बुलडोझर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
मोरजी समुद्रकिनाऱ्यावर दुसऱ्या दिवशीही बेकायदा बांधकामांवर बुलडोझर

पणजी : मोरजी येथील तेमवाडा समुद्रकिनारी परिसरात किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.  संबंधित विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवत नियमबाह्य बांधकामे पाडण्याची प्रक्रिया सुरू ठेवली.

समुद्रकिनारी पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या विविध संरचनांवर कारवाई करण्यात येत आहे.  सीआरझेड नियमांचे काटेकोर पालन करण्याचा प्रशासनाचा निर्धार यावेळी पुन्हा स्पष्ट झाला. कारवाईदरम्यान परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, किनारपट्टीचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आणि सीआरझेड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अनधिकृत बांधकामाला पाठीशी घातले जाणार नाही. आवश्यकतेनुसार पुढील काही दिवसही ही मोहीम सुरू राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा
सर्व पहा