Home >> गोवा >> 'वाळवी' पोस्टवरून टीका; सावईकरांनी फेसबुक पोस्ट हटवली

'वाळवी' पोस्टवरून टीका; सावईकरांनी फेसबुक पोस्ट हटवली

भाजप देश पोखरणारा कॅन्सर : सुनिल कवठणकर, कॉंग्रेस

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
'वाळवी' पोस्टवरून टीका; सावईकरांनी फेसबुक पोस्ट हटवली

पणजी : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर यांनी फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. आंदोलनकर्त्यांना 'वाळवी' असे संबोधल्याचा आरोप होताच विविध स्तरांतून सावईकरांवर टीका झाली. वाढत्या विरोधानंतर त्यांनी संबंधित फेसबुक पोस्ट हटवली.

या प्रकरणावर काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेत सावईकरांच्या वक्तव्याचा निषेध केला. काँग्रेसचे पदाधिकारी सुनिल कवठणकर यांनी जोरदार पलटवार करत, "भारतीय जनता पक्ष हा देश पोखरणारा कॅन्सर आहे," अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

कवठणकर यांनी भाजपच्या नेतृत्वावरही निशाणा साधत, विरोधकांवर अवमानकारक भाषेचा वापर करणे ही भाजपची राजकीय संस्कृती असल्याचा आरोप केला. सावईकरांनी पोस्ट हटवणे म्हणजे ती चूक असल्याची अप्रत्यक्ष कबुली असल्याचेही म्हटले.

दरम्यान, या फेसबुक पोस्टमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.  सावईकर यांनी पोस्ट हटवली असली, तरी या वादावरून राजकीय चर्चा कायम आहे.

हेही वाचा
सर्व पहा