Home >> गोवा >> कंत्राटी वीज मीटर रीडरना सेवेत कायम करा

कंत्राटी वीज मीटर रीडरना सेवेत कायम करा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
कंत्राटी वीज मीटर रीडरना सेवेत कायम करा

पणजी : मागील बारा वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या मीटर रीडरना कायम करावे, व अन्य मागण्यांसाठी मंगळवारी वीज खात्यावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांसह अमित पाटकर अजय प्रभुगावकर उपस्थित होते. २० सप्टेंबरपर्यंत  मीटर रीडरना कायम न केल्यास २१ सप्टेंबरपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबत खात्याचे अधीक्षक अभियंता मयूर हेदे यांना निवेदन देण्यात आले. हेदे यांनी राज्य सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले. 

याबाबत अमित पाटकर यांनी सांगितले की, वीज खात्यात १०२ मीटर रीडर २०१४ पासून कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांनी आपल्याला सेवेत कायम करावे यासाठी वेळोवेळी खात्याकडे निवेदन दिले आहे. मात्र खात्याने याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. सध्या या कर्मचाऱ्यांचे कंत्राट ऑक्टोबर २०२६ मध्ये संपणार आहे.

या कर्मचाऱ्यांना नवीन कंत्राट न देता त्यांना सेवेत कायम करणे आवश्यक आहे. याशिवाय त्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे पीएफ, सुरक्षा उपकरणे व अन्य सुविधा देण्यात आल्या पाहिजेत. हे कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढत आहेत. त्यामुळे मोर्चा काढला म्हणून त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जाऊ नये. 

हेही वाचा
सर्व पहा