Home >> गोवा >> ट्रॉलरवरील ३.०४ लाखांचे मासेमारी साहित्य पळविले

ट्रॉलरवरील ३.०४ लाखांचे मासेमारी साहित्य पळविले

तामिळनाडूतील कामगाराविरुद्ध गुन्हा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
ट्रॉलरवरील ३.०४ लाखांचे मासेमारी साहित्य पळविले

वास्को : येथील खारेवाडा जेटीवर उभ्या असलेल्या एका मासेमारी ट्रॉलरवरील सुमारे ३.०४ लाख रुपयांचे मासेमारी साहित्य व उपकरणे पळविल्याप्रकरणी तामिळनाडूतील एका कामगाराविरुद्ध वास्को पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खारेवाडा, वास्को येथील रहिवासी नेनी रेमेडिना फर्नांडिस ई डिसोझा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पी. रॉबिन (रा. कन्याकुमारी, तामिळनाडू)  हा त्यांच्या मासेमारी ट्रॉलरवर कामगार म्हणून कार्यरत होता. त्याच्याकडे ट्रॉलरवरील मासेमारी साहित्य, उपकरणे आणि इतर चल मालमत्तेची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

तक्रारीनुसार, ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत संशयिताने नोकरी सोडताना ट्रॉलरवरील महत्त्वाची उपकरणे सोबत नेल्याचा आरोप आहे. यामध्ये दोन वायरलेस सेट (₹३६,०००), ए.एस. युनिट (₹७७,०००), इको साउंडर (₹१.५२ लाख), कार्मेल जीपीएस (₹१८,०००) आणि पॅराशूट (₹२१,५००) या साहित्याचा समावेश आहे. एकूण सुमारे ₹३.०४ लाखांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे ट्रॉलरच्या मासेमारीच्या कामकाजावर परिणाम झाला असून, मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी वास्को पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१६(२) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश वेळीप पोलीस निरीक्षक वैभव नाईक यांच्या देखरेखीखाली तसेच मुरगावचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा