Home >> गोवा >> अभियांत्रिकी पेशा वाढविण्यात सरकारी अभियंत्यांचे योगदान नाही!

अभियांत्रिकी पेशा वाढविण्यात सरकारी अभियंत्यांचे योगदान नाही!

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत : साखळी इंजिनियर्स असोसिएशनचे उद्घाटन

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
19th July, 11:50 pm
अभियांत्रिकी पेशा वाढविण्यात सरकारी अभियंत्यांचे योगदान नाही!

साखळी : गोव्यातील अनेक अभियंत्यांनी सरकारी नोकरी स्वीकारल्यानंतर आपली पुढील वाटचाल जवळजवळ ‘स्विच ऑफ’ केली आहे. सरकारी नोकरीत राहून केवळ पगार मिळवण्याची मानसिकता ठेवल्यामुळे आज अनेकदा त्यांना त्यांच्या कामाची आठवण करून द्यावी लागते. आपल्या अभियांत्रिकी पेशाचा समाजाला किंवा नवीन पिढीला लाभ करून देण्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही योगदान दिले जात नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे, अशी खंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
नव्याने स्थापन झालेल्या साखळी इंजिनियर्स असोसिएशन संघटनेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते साखळी येथे करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गोव्यात सध्या अभियंता पदाची साडेचारशे पदे रिक्त असणे, हे सरकारसाठी नुकसानकारक आहे. अभियांत्रिकी शिक्षणासाठी सरकार विविध महाविद्यालयांमध्ये आर्थिक मदत देत असते. अशा वेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे आकर्षित करणे हे अभियंत्यांचे कर्तव्य आहे. युवकांनी केवळ पारंपरिक बीए, बीकॉम किंवा बीएससी पदव्यांवर अवलंबून न राहता, सध्या बाजारात वाव असलेल्या तांत्रिक शिक्षणावर भर दिला पाहिजे. तसे झाल्यास आगामी काळात गोव्यात अभियंत्यांची उणीव भासणार नाही.
या सोहळ्याला साखळी रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, माहिती व तंत्रज्ञान संचालक कबीर शिरगावकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता संदीप के. पी. चोडणेकर, जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर आणि वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस उपस्थित होते. तसेच जीएसआयडीसीचे महाव्यवस्थापक सुधीर परब, गोवा उद्योग संघटनेचे उपाध्यक्ष नारायणराव देसाई, टेक्नॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष मंगिरीश सालेलकर, लघु उद्योग भारतीचे सुशांत रावळ, जीईसीचे अधिष्ठाता सूरज राणे, आयसीआय गोवा केंद्राच्या अध्यक्षा जेनिफर लुईस ई कामत, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सागर साकोर्डेकर, प्रा. रश्वीता गडेकर, इडीसीचे व्यवस्थापकीय संचालक भालचंद्र एस. पै आंगले, सीआयबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन करमली, सिवन अंबट्टू आणि डी. एस. प्रशांत या दिग्गजांची उपस्थिती होती. याप्रसंगी खासगी व सरकारी क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंत्यांसह अभियंता अंकुर काणकोणकर यांनी आपले अनुभव मांडले.
साखळी इंजिनियर्स असोसिएशनची नूतन समिती
समन्वयक: राहुल परब, सुरज नाईक, राधाप्रसाद बोरकर, सिद्धेश साळुंखे, अमोल बेतकीकर. गाभा व कार्यकारी समिती: दिनेश गावस, अजिंक्य परब, ओमकार साखळकर, संदीप पार्सेकर, वटवृक्ष देसाई (विजेंद्र देसाई), वामन साखळकर, प्रतीक नागवेकर, सिद्धार्थ मळीक, शाणू उसगावकर, अंबरीश महाले, विजय पवार, यश अवखळे, शिवम गावकर, राजदत्त मापारी, अक्षय नाईक, विशांत एकावडे, प्रसाद पांगम, सुशांत पोकळे, यतीन काणेकर, पियुष रामनाथकर, नितेश सामंत. आऊटरिच समिती: निखिल कुंभार, स्नुषा शिरोडकर, अंगद कामत, साईप्रसाद परब, दर्शन परब, प्रज्वल गावस, लक्ष्मण गावस, वीरेंद्र एकावडे, दिपेश सडेकर, राजू पिरांका, आदित्य गावस, शशांक भगत.