Home >> देश -परदेश >> त्रिपुराचे पोलीस महासंचालक अनुराग धणकर कार्यालयात मृतावस्थेत आढळले

त्रिपुराचे पोलीस महासंचालक अनुराग धणकर कार्यालयात मृतावस्थेत आढळले

आत्महत्येचा संशय

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
20th July, 05:16 pm
त्रिपुराचे पोलीस महासंचालक अनुराग धणकर कार्यालयात मृतावस्थेत आढळले

आगरतळा : त्रिपुराचे पोलीस महासंचालक (DGP)  अनुराग धणकर सोमवारी आगरतळा येथील पोलीस मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयात मृतावस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Tripura Director General of Police Anurag Dhankar was found dead in his office chamber at the Police Headquarters in Agartala on Monday.).  प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असला तरी मृत्यूचे नेमके कारण शवचिकीत्सा अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

धणकर यांना तातडीने गोविंद बल्लभ पंत (जीबीपी) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यात जीवित असल्याची चिन्हे आढळून आली नव्हती. डॉक्टरांनी सुमारे ४८ मिनिटे सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र तो निष्फळ ठरला. दुपारी १२.४८ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव किरण गिट्टे यांनी सांगितले की, प्राथमिक स्तरावर आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असला तरी अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

जीबीपी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर डॉ. प्रदीप भौमिक यांनी सांगितले की, धणकर यांना दुपारी सुमारे १२ वाजता रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी त्यांचा नाडीचा ठोका, रक्तदाब, शरीराचे तापमान किंवा इतर कोणतीही जीवंत असल्याची चिन्हे नव्हती. वैद्यकीय पथकाने तातडीने सीपीआर सुरू करून जवळपास ४८ मिनिटे प्रयत्न केले.  मात्र त्यांना वाचविणे शक्य झाले नाही.

धणकर यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि इतर कोणत्याही जखमेच्या खुणांबाबतची माहिती शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, सर्व पैलूंवर चौकशी केली जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा