Home >> क्रीडा >> मेस्सीने कडेवर खेळवलेला लॅमिन यामाल आता प्रतिस्पर्धी बनून मैदानावर उभा ठाकणार!

मेस्सीने कडेवर खेळवलेला लॅमिन यामाल आता प्रतिस्पर्धी बनून मैदानावर उभा ठाकणार!

न्यू जर्सीत रंगणाऱ्या फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम लढतीत अर्जेंटिना आणि स्पेन एकमेकांशी भिडणार आहेत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12 mins ago
मेस्सीने कडेवर खेळवलेला लॅमिन यामाल आता प्रतिस्पर्धी बनून मैदानावर उभा ठाकणार!

न्यू जर्सी : नियतीचे चक्र कसे फिरते आणि इतिहासाची पाने कशी अचंबित करणारी वळणे घेतात, याचे जिवंत उदाहरण म्हणजे फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना ठरणार आहे. न्यू जर्सीतील ईस्ट रदरफोर्ड येथे रविवारी रंगणाऱ्या या महामुकाबल्यात डिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिना आणि युरोपियन चॅम्पियन स्पेन आमनेसामने येत आहेत. परंतु, हा सामना केवळ दोन देशांमधील नसून, फुटबॉल जगतातील सर्वोत्तम खेळाडू लिओनेल मेस्सी आणि स्पेनचा १९ वर्षांचा उदयोन्मुख स्टार लॅमिन यामाल यांच्यातील एका अद्भूत आणि भावनिक प्रवासाचा परमोच्च बिंदू आहे. सुमारे १९ वर्षांपूर्वी ज्या मेस्सीने एका चॅरिटी फोटोशूटदरम्यान अवघ्या पाच महिन्यांच्या यामालला एका बाथटबमध्ये आंघोळ घातली होती, तोच बालक आज फुटबॉलच्या सर्वात मोठ्या मंचावर मेस्सीचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्याच्यासमोर उभा ठाकला आहे.


What Lamine Yamal Said About Facing Messi in the World Cup Final | MARCA


 २००७ च्या उन्हाळ्या कॅटलन वृत्तपत्र 'दिआरिओ स्पोर्ट'ने युनिसेफच्या सहकार्याने एका चॅरिटी कॅलेंडरसाठी फोटोशूट आयोजित केले होते. या कॅलेंडरमधून गोळा होणारा निधी लहान मुलांच्या कल्याणासाठी वापरला जाणार होता. बार्सिलोना परिसरातील स्थानिक कुटुंबांसाठी बार्सिलोना क्लबच्या खेळाडूंसोबत फोटो काढण्याची एक लॉटरी म्हणजेच राफल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रोका फोंडा येथील एका सामान्य कुटुंबाची निवड झाली. हे कुटुंब दुसरे कोणी नसून लॅमिन यामालचे होते. अवघ्या ५ महिन्यांच्या यामालला घेऊन त्याची आई शीला इबाना कॅम्प नोऊ स्टेडियमवर पोहोचली. तेथे बार्सिलोनाचा तत्कालीन २० वर्षांचा उगवता तारा लिओनेल मेस्सी या फोटोशूटसाठी येणार होता.


Lionel Messi with Lamine Yamal as a baby & Yamal Mother back in December  2007, from a photoshoot that was organised for a charity calendar.


त्या वेळचे प्रत्यक्षदर्शी आणि छायाचित्रकार जोआन मॉनफोर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो प्रसंग अत्यंत अवघड आणि काहीसा मजेशीर होता. मेस्सी मुळातच अत्यंत लाजाळू आणि अंतर्मुख स्वभावाचा होता. जेव्हा तो चेंजिंग रूममधून बाहेर आला, तेव्हा त्याला समोर एका प्लास्टिकच्या टबमध्ये पाणी आणि त्यात एक लहान बाळ दिसले. वयाच्या २० व्या वर्षी मेस्सीला लहान मुलांना कसे हाताळावे याचे ज्ञान नव्हते. सुरुवातीला तो बाळ यामालला जवळ घेण्यासही कचरत होता. परंतु हळूहळू वातावरण निवळले आणि मॉनफोर्ट यांनी आपल्या कॅमेऱ्यात तो ऐतिहासिक क्षण टिपला, जिथे मेस्सी हसतमुखाने त्या लहानग्या यामालला टबमध्ये आंघोळ घालताना दिसत आहे. कोणालाही कल्पना नव्हती की हा फोटो भविष्यातील दोन महानायकांच्या भेटीचा साक्षीदार ठरेल.


Photo surfaces of Lionel Messi with Lamine Yamal as a baby


हा फोटो दोन वर्षांपूर्वी युरोपियन चॅम्पियनशिपदरम्यान जगजाहीर झाला, जेव्हा यामालच्या वडिलांनी मुनीर नसरावई यांनी सोशल मीडियावर "BEGINNING OF TWO FAIRYTAILS" या कॅप्शनसह तो पोस्ट केला. त्यानंतर यामालने फुटबॉल जगतात आपला असा काही दबदबा निर्माण केला की, वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी बार्सिलोनासाठी पदार्पण करत त्याने सर्वांना थक्क केले. स्पेनला युरो कप जिंकून देण्यात आणि आता विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात यामालचा वाटा सिंहाचा आहे. उपांत्य फेरीत स्पेनने फ्रान्सचा २-० असा पराभव केला, तर दुसऱ्या बाजूला ३९ वर्षांच्या मेस्सीने आपल्या जादुई खेळाच्या जोरावर इंग्लंडविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात अर्जेंटिनाला २-१ असा विजय मिळवून दिला.


20 years apart, Yamal and Messi chase greatness on the same day, the same  way | FOX Sports


आता हे दोन खेळाडू पहिल्यांदाच मैदानावर एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. यामालने यापूर्वीच मेस्सीविरुद्ध खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती, जी आता पूर्ण होत आहे. मेस्सी सध्या स्पर्धेत दोन असिस्ट्ससह गोल्डन बूटच्या शर्यतीत किलीयन एम्बाप्पेपेक्षा किंचित पुढे आहे. तर दुसरीकडे, बॅलन डी'ओरसाठी नामांकित झालेला आजवरचा सर्वात तरुण खेळाडू असलेला यामाल मेस्सीचा हा रथ रोखण्यासाठी सज्ज झाला आहे. एका बाजूला कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असलेला जगातील सर्वोत्तम खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला त्याचा वारसदार मानला जाणारा तरुण तुर्क, अशा या ऐतिहासिक लढतीकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत. कॅम्प नोऊच्या त्या छोट्या प्लास्टिक टबमधून सुरू झालेला हा प्रवास आता न्यू जर्सीच्या स्टेडियमवर कोणत्या थरावर पोहोचतो, हे पाहणे कमालीचे ठरेल.


Lamine Yamal eclipses Lionel Messi mark with career-first World Cup goal -  The Mirror US